NATO Exercise: 7500 सैनिक, 1000 वाहने आणि 150 लढाऊ विमाने… रशियन सीमेजवळ नाटोचा महाविनाशक 'युद्धाभ्यास'

NATO: या सरावात 14 नाटो देश सहभागी होत आहेत. आर्क्टिक चॅलेंज मिलिटरी एक्सरसाइज 2023 नावाचा हा सराव फिनलंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
NATO Exercise
NATO ExerciseDainik Gomantak
Published on
Updated on

NATO Exercise: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. यातच, रशियाच्या सीमेजवळ नाटोने महाविनाशक युद्धाभ्यास सुरु केला आहे. या सरावात 14 नाटो देश सहभागी होत आहेत. आर्क्टिक चॅलेंज मिलिटरी एक्सरसाइज 2023 नावाचा हा सराव फिनलंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, फिनलंड, नाटोचा नवीन सदस्य, रशियाशी सीमा सामायिक करतो. या सरावात अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, फिनलंडसह 14 देशांतील 7500 सैनिक, 1000 हून अधिक वाहने आणि 150 लढाऊ विमाने सहभागी आहेत.

फिनलंडमध्ये (Finland) आयोजित केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव मानला जात आहे. फिनलंडमधील रोवाजारवी येथे हा सराव सुरु आहे. हे युरोपमधील सर्वात मोठे तोफखाना प्रशिक्षण मैदान आहे. येथून रशियन सीमा फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे.

NATO Exercise
Russia-Ukraine War: चिवट युक्रेनच्या हल्ल्यामुळे रशिया सळो की पळो; पुतिन यांचे सीमेवर सुरक्षा वाढवण्याचे आदेश

150 विमाने आपली ताकद दाखवतील

आर्क्टिक चॅलेंज 2023 मध्ये सहभागी झालेल्या यूएस आर्मीच्या 10व्या माउंटन डिव्हिजनचे मेजर जनरल ग्रेगरी अँडरसन म्हणाले की, त्यांचा देश फिनलंडचे रक्षण करण्यास तयार आहे. फिनलंडचे रक्षण करण्यासाठी अमेरिकन सैन्य या नवीन नाटो सहयोगीसोबत प्रशिक्षण घेत आहे.

NATO एअर कमांडनुसार, 14 NATO सदस्य आणि भागीदार देशांतील सुमारे 150 विमाने या सरावात आपली ताकद दाखवत आहेत.

स्वीडिश लँड फोर्सेसचे कमांडर मेजर जनरल कार्ल एंजेलब्रेक्सन म्हणाले की, आम्हाला फिनलँडच्या संरक्षणाचा भाग व्हायचे आहे. त्यामुळे आम्ही उर्वरित भागीदार देशांसोबत हा सराव करत आहोत.

फिनलंडच्या भूमीवर नाटो देश एकत्र आले

स्वीडन हा फिनलंडचा सर्वात जवळचा लष्करी भागीदार आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर जुन्या धोरणाचा त्याग करुन दोन्ही देशांनी गेल्या वर्षी नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. 4 एप्रिल रोजी फिनलंड औपचारिकपणे नाटोमध्ये सामील झाला.

मात्र, तुर्की (Turkey) आणि हंगेरीच्या आक्षेपामुळे स्वीडनचे सदस्यत्व रखडले. NATO मध्ये फिनलंडच्या प्रवेशामुळे रशियन सीमेवर नाटो सैन्याची उपस्थिती वाढली आहे.

जुलैमध्ये लिथुआनियाची राजधानी विल्निअस येथे होणाऱ्या नाटो शिखर परिषदेत स्वीडनचाही या लष्करी आघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे.

NATO Exercise
Russia-Ukraine War: युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला, जगभरात किरणोत्सर्गाचा 'धोका'

रशिया सावध झाला, रडार तैनात केले

सीमेजवळील नाटोच्या उपस्थितीने रशिया सावध झाला आहे. फिनलंडच्या सीमेवर रशियाने आधीच आपल्या सैन्याची संख्या वाढवली आहे. याशिवाय, रशियन रडार 24 तास फिन्निश सीमेवर लक्ष ठेवून आहेत. हे रडार फिनलंडच्या आत शेकडो किलोमीटरपर्यंत हेरगिरी करण्यास सक्षम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com