Anwar Ul Haq Kakkar: मोठी बातमी! बलुचिस्तानच्या खासदाराकडे पाकिस्तानची धूरा, कोण आहेत काळजीवाहू पंतप्रधान?

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांनी काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी अन्वर उल हक कक्कड यांच्या नावावर एकमत केले आहे.
Anwar Ul Haq Kakkar
Anwar Ul Haq KakkarDainik Gomantak
Published on
Updated on

Anwar Ul Haq Kakkar: पाकिस्तानचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांनी काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी अन्वर उल हक कक्कड यांच्या नावावर एकमत केले आहे. अन्वर उल हक कक्कड हे बलुचिस्तानचे खासदार आहेत.

पीएम हाऊसचा हवाला देत जिओ न्यूजने हे वृत्त दिले आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बलुचिस्तानचे (Balochistan) खासदार सिनेटर अन्वर-उल-हक कक्कड यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बलुचिस्तानचे खासदार सिनेटर अन्वर-उल-हक कक्कड यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांच्यात झालेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना देण्यात आली.

Anwar Ul Haq Kakkar
Pakistan Political Crisis: पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपती अल्वींनी घेतला मोठा निर्णय

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रियाझ म्हणाले की, "आम्ही ठरवले की, काळजीवाहू पंतप्रधान एका छोट्या प्रांतातील असतील.'' कक्कड यांचे नाव त्यांनी सुचविले होते, ते मंजूर करण्यात आले आहे.''

राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून 12 ऑगस्ट (शनिवार) पर्यंत काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी 'योग्य व्यक्ती' चे नाव सुचवण्याबाबत सांगितले होते.

Anwar Ul Haq Kakkar
Pakistan Political Crisis: इम्रान खानला आणखी एक मोठा झटका, पीटीआय अध्यक्ष परवेझ इलाही यांना अटक

दुसरीकडे, पीएम शाहबाज आणि रियाझ यांनी पत्र लिहून राष्ट्रपतींना कळवले की, कलम 224A अंतर्गत नॅशनल असेंब्ली विसर्जित झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्यांना काळजीवाहू पंतप्रधानासाठी नाव सुचवायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com