UN Chief Antonio Guterres: गांधी जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी आठवण करून दिली बापूंच्या शिकवणीची...

महात्मा गांधींच्या मूल्यांचा अंगीकार करून आजच्या आव्हानांना पराभूत केले जाऊ शकते, असे राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे. गुटेरेस यांनी ट्विट करून बापूंना श्रद्धांजली वाहिली आहे.
Mahatma Gandhi Jayanti 2022
Mahatma Gandhi Jayanti 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Antonio Guterres Remark Over Mahatma Gandhi: संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. आज (2 ऑक्टोबर) महात्मा गांधींची 153 वी जयंती आहे. त्यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून ट्विट करून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली,

Mahatma Gandhi Jayanti 2022
Indonesia त फुटबॉल मैदानावर मृत्यूचा नंगा नाच, हिंसाचारात 127 ठार; अनेकजण जखमी

यामध्ये त्यांनी म्हटले की, महात्मा गांधींच्या मूल्यांचा अवलंब करून आपण आजच्या आव्हानांवर मात करू शकतो. आंतरराष्‍ट्रीय अहिंसा दिनानिमीत्‍त, आम्‍ही महात्मा गांधींचा जयंती आणि शांतता, आदर आणि सर्वांनी सामायिक केलेली अत्यावश्यक प्रतिष्‍ठेची मुल्‍ये साजरी करतो. ही मूल्ये आत्मसात करून आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी संस्कृती आणि सीमा ओलांडून काम करून आपण आजच्या आव्हानांना पराभूत करू शकतो.

संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी ट्विटमध्ये हे लिहिले आहे

यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त, आम्ही महात्मा गांधींचा जन्मदिन आणि सर्वांनी सामायिक केलेली शांतता, आदर आणि आवश्यक प्रतिष्ठेची मूल्ये साजरी करतो. ही मूल्ये आत्मसात करून आणि एक चांगले भविष्य घडवण्यासाठी संस्कृती आणि सीमा ओलांडून काम करून आपण आजच्या आव्हानांवर मात करू शकतो. हे स्मारक अहिंसेचा संदेश देते.

Mahatma Gandhi Jayanti 2022
Fingers Length: लैंगिकता अन् बोटांच्या लांबीचं काय गणित? संशोधनात धक्कादायक खुलासा

महात्मा गांधींना जगात आदर्श मानले जाते

महात्मा गांधी हे सत्य आणि अहिंसेच्या मूल्यांसाठी जगभरात आदर्श मानले जातात. महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन अनेक देश स्वतंत्र झाले. 2019 मध्ये, परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर सामायिक केलेल्या माहितीनुसार, 84 देशांमध्ये महात्मा गांधींच्या 110 हून अधिक पुतळे स्थापित आहेत. पाकिस्तान, चीन आणि रशियामध्येही त्यांची शिल्पे बसवण्यात आली आहेत. अमेरिकेतील महात्मा गांधींचे आठ आणि जर्मनीतील 11 पुतळे लोकांना प्रेरणादायी आहेत.

महात्मा गांधींनी सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह चळवळ सुरू केली. येथे बापूंच्या तीन मूर्ती आहेत. त्याच वेळी, सुमारे 30 देशांमधील आणखी 80 मार्गांना महात्मा गांधींची नावे देण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com