इस्रायलचा आता सीरियावरही हल्ला, दोन विमानतळांना केलं लक्ष्य

Syria: हमास या दहशतवादी संघटनेशी लढणाऱ्या इस्रायलने आता शेजारील देश सीरियावरही हल्ला केला आहे.
Israel is now attacking Syria
Israel is now attacking SyriaDainik Gomantak

Syria Claims Israel Struck Airports In Damascus, Aleppo: हमास या दहशतवादी संघटनेशी लढणाऱ्या इस्रायलने आता शेजारील देश सीरियावरही हल्ला केला आहे. सीरियन वृत्तपत्र 'अल-वतन'ने गुरुवारी ही माहिती दिली.

वृत्तानुसार, इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हल्ला केला आहे, त्यामुळे या दोन्ही विमानतळांवरील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विमानतळाच्या धावपट्टीवर गोळीबार करण्यात आला आहे.

दरम्यान, या हल्ल्यांद्वारे इस्रायलने इराणमधून येणाऱ्या शस्त्रांना लक्ष्य केल्याचा संशय आहे. सीरियन लष्करानेही प्रत्युत्तर दिले आहे.

सीरियाच्या (Syria) सरकारी वृत्तवाहिनीने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, दुपारी दीडच्या सुमारास इस्रायली सैन्याने अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट डागले. यामुळे हवाई पट्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

Israel is now attacking Syria
Israel Hamas War: ट्रम्प यांनी इस्रायलच्या युद्ध तयारीवर प्रश्न केले उपस्थित, नेतन्याहू हमासवरील हल्ल्यासाठी...

दुसरीकडे, ज्यू सुट्टीच्या दिवशी (7 ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत प्रवेश करुन मोठा हल्ला केला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या इस्रायलला या हल्ल्याची दखलही घेता आली नाही. यानंतर इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत हमासचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

Israel is now attacking Syria
Israel-Hamas War: 'मुलांच्या फोनवरुन TikTok, Instagram अनइंस्टॉल करा', ज्यूइश शाळांकडून पालकांना आवाहन

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. हमासच्या (Hamas) हल्ल्यानंतर सुरु झालेले युद्ध अद्यापही सुरुच आहे. युद्धात भाग घेण्यासाठी जगभरातून इस्रायली तेल अवीवमध्ये पोहोचत आहेत.

या युद्धात इस्रायलमधील मृतांची संख्या 1,200 वर पोहोचली आहे, तर गाझावरील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 1,100 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com