अमेरिकेची पहिली खाजगी मून लँडर मोहीम अयशस्वी, पृथ्वीच्या दिशेने येणारे Peregrine होणार जळून खाक

US Moon Lander: 'नवीन मूल्यांकनावरून असे दिसून आले आहे की, अंतराळयान पृथ्वीच्या दिशेने येत आहे. जसजसे ते पृथ्वीजवळ येईल तसतसे ते वातावरणात जळून जाईल.
America's first private moon lander mission Peregrine
America's first private moon lander mission PeregrineDainik Gomantak

America's first private moon lander mission fails, Peregrine burns up on approach to Earth:

मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रावर पाठवलेले पहिले व्यावसायिक अमेरिकन मिशन तांत्रिक दोषामुळे अयशस्वी झाले आहे. ॲस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी कंपनीने ही व्यावसायिक चंद्र मोहीम पाठवली. परंतु इंधन गळतीमुळे कंपनीला चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याच्या प्रयत्नातून माघार घ्यावी लागली.

आता ते पृथ्वीच्या दिशेने परतत आहे. कदाचित ते वातावरणात जळून खाक होईल असा कंपनीचा विश्वास आहे.

अपोलो मोहिमेनंतर 50 वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले अंतराळ यान उतरवण्यासाठी युनायटेड लॉन्च अलायन्सच्या व्हल्कन रॉकेटवर 8 जानेवारी रोजी पेरेग्रीन चंद्र लँडर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले होते.

लँडर लाँच व्हेइकलपासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. परंतु काही तासांनंतर, ॲस्ट्रोबोटिकने त्यामध्ये बिघाड नोंदवण्यास सुरुवात केली. पेरेग्रीनच्या सौर पॅनेलला सूर्याकडे वळवण्यास आणि त्याच्या बॅटरी टॉप अप ठेवण्याच्या अक्षमतेमुळे सुरुवातीला झालेल्या त्रुटीमुळे अंतराळ यानाच्या बाह्य भागाचे नुकसान झाले.

America's first private moon lander mission Peregrine
पाकिस्तानने पोसलेले दहशवादी त्यांच्यावरच उलटले, लष्करावरील हल्ल्यात 5 जवान ठार

चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची कोणतीही शक्यता नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. पेरेग्रीन लँडरमध्ये अंदाजे 40 तास इंधन शिल्लक आहे. ॲस्ट्रोबोटिकने म्हटले होते की, प्रणोदक संपेपर्यंत अंतराळयान चालवण्याची योजना आहे.

ॲस्ट्रोबोटिक त्यांच्या पुढील मिशनच्या तयारीसाठी डेटा प्राप्त करत आहे. Astrobotic या वर्षाच्या शेवटी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नासा रोव्हर घेऊन जाणारे ग्रिफिन लँडर पाठवण्याची तयारी करत आहे.

America's first private moon lander mission Peregrine
PoK ला भेट देणाऱ्या कोण आहेत ब्रिटीश राजदूत जेन मॅरियट? भारताने व्यक्त केली नाराजी

पिट्सबर्गस्थित कंपनीने सांगितले की, 'नवीन मूल्यांकनावरून असे दिसून आले आहे की, अंतराळयान पृथ्वीच्या दिशेने येत आहे. जसजसे ते पृथ्वीजवळ येईल तसतसे ते वातावरणात जळून जाईल.

कंपनीने सांगितले की बॉक्सच्या आकाराचा रोबोट म्हणजेच पेरेग्रीन लँडर पाच दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळात आहे. सध्या ते पृथ्वीपासून 2,42,000 मैल म्हणजेच 3,90,000 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच वेळी, तज्ञांचा असा विश्वास होता की पूर्वीच्या अयशस्वी मोहिमांप्रमाणे ते चंद्रावर लँडिंग करू शकते. मात्र, लँडर हे लक्ष्यही साध्य करू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com