नासा आणि स्पेसएक्स चंद्रावर पाठवणार लँडर; हा खर्च गोव्याच्या एक वर्षाच्या बजेटइतका

NASA, SpaceX.jpg
NASA, SpaceX.jpg
Published on
Updated on

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने उद्योगपती एलोन मस्क यांची कंपनी  स्पेसएक्सची चंद्रावर लँडर  पाठविण्यासाठी निवड केली आहे. या लँडरचे नाव मूनवॉकर असे आहे. पुढील आठवड्यातील होणाऱ्या क्रू लॉन्चपूर्वीच नासाने ही घोषणा केली. पुढच्या आठवड्यात, नासाचे अंतराळवीर फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलहून स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) प्रवास सुरू करतील. या प्रवासात पहिली महिला आणि प्रथम काळा अंतराळवीर पाठविण्यात येणार आहे. (NASA and SpaceX to send landers to the moon; This cost is equal to Goa's annual budget) 

एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्सने जेफ बेझोसची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिन आणि डायनामिक्सला मागे टाकून चंद्रावर लँडर पाठविण्याची संधी मिळवली आहे. चंद्रावर लँडर पाठविण्यासाठी नासाने स्पेसएक्ससोबत 2.89 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 21,542 कोटी रुपयांचा करार केला आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम गोवा सरकारच्या एका वर्षाच्या अर्थसंकल्पाइतकीच आहे.

याबाबत नासाचे अॅक्टिंग एडमिनिस्ट्रेटर स्टीव्ह जार्किक यांनी माहिती दिली आहे. आम्ही फक्त चंद्रापर्यंत थांबणार नाही, आमच शेवटचे लक्ष्य मंगळ ग्रह आहे. लँडरला चंद्रावर पाठविण्याची तारीख नासाने अद्याप जाहीर केलेली नाही. कारण सध्या यासाठी आढावा चालू आहे. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने यासाठी 2024 ची अंतिम मुदत निश्चित केली होती. पण नासाने आता त्याला फक्त लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.

तर, जेव्हा आम्हाला सुरक्षितता आणि अचूकतेबद्दल योग्य माहिती मिळेल तेव्हा आम्ही याबाबत पुढील माहिती प्रसिद्ध करू. असे नासाच्या मानवी अंतराळ अन्वेषणाचे प्रमुख कॅथी लुडर म्हटले आहे. तसेच,नासा आणि स्पेसएक्स एकत्र या दशकाअखेरीस मानवांना अवकाशात पाठविण्यात यश मिळवेल, याकडे कॅथीने लुडर यांनी लक्ष वेधले. हे अंतराळवीर नासाच्या ओरियन कॅप्सूलमध्ये प्रक्षेपित (लॉन्च)  केले जातील. या प्रवासादरम्यान ते  चंद्राच्या कक्षेत असलेल्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटकडे जातील. त्यानंतर ते त्याच स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून चंद्रावर उतरतील. मूनवॉकर्स लँडरची सवारी करतील. त्यांचे प्रयोग संपल्यानंतर, ते स्टारशिप रॉकेटसह पृथ्वीवर परततील.

दरम्यान, अंतराळ प्रवासासाठी फ्लोरिडामध्ये आलेल्या चार अंतराळवीरांचे  अॅक्टिंग एडमिनिस्ट्रेटर  स्टीव्ह जार्किक यांनी  स्वागत केले. त्यानंतर  या अंतराळवीरांनी स्टीव्हची केनेडी स्पेस सेंटर येथे भेट घेतली.  चार अंतराळवीर पुढील गुरुवारी अंतराळ स्थानकातून सुटतील, संपूर्ण दशकानंतर आम्ही एका वर्षात तीन क्रू मिशन सुरू करू शकू, असा दावा स्टीव्ह केनेडी यांनी केला आहे. 

अंतराळ स्थानकात जाणारे  2 अंतराळवीर अमेरिकन आहेत, तर 1 फ्रान्स आणि 2रा जपानमधील आहेत. या मोहिमेचे चे कमांडर शेन किंब्रो नासाचा शेन किंब्रो हे असणार आहेत ज्यांनी या आधिदेखील  अंतराळ प्रवासीहीम केली आहे. तर मेगन मॅकआर्थर, फ्रान्सचा थॉमस पिस्केट आणि जपानचा अकिहिको होशिइड. आम्ही खरोखर अंतराळ स्थानकात परत जात आहोत हे स्वप्नवत नसल्याचे कमांडर शेन किंब्रो यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गुरुवारी, 22 एप्रिल रोजी स्पेसएक्स पहिल्यांदा रीसायकल केलेल्या फाल्कन रॉकेट्स आणि ड्रॅगन कॅप्सूलचा वापर करणार आहे.  अंतराळ प्रवासासाठी अमेरिकेच्या खासगी कंपन्यांसाठी नासाने स्पेसएक्सची निवड केली असून  नासाने आपला अंतराळ शटल कार्यक्रम २०११ मध्ये बंद करण्यात या अला होता. तर याबाबत शेन किंब्रो यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पूर्वीच्या सुधारित रॉकेट आणि कॅप्सूलमध्ये अवकाशात जावे लागेल, असे आम्हाला आधी  सांगण्यात आले असते तर मी कदाचित मोहिमेसाठी नकार दिलला असता. मात्र आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहोत, आम्हाला अशा उड्डाणांचा अनुभव आहे. तसेच, नासा आणि स्पेसएक्स एकत्र काम करत आहेत ते  त्यामुळे कोणतीही भीती नाही. कारण रॉकेट आणि कॅप्सूल वापरण्यापूर्वी स्पेसएक्सने बर्‍याच वेळा माल पाठविला आहे.

अंतराळवीर मेगर मॅकआर्थर ड्रॅगन कॅप्सूल ते अंतराळ स्थानकापर्यंत पहिल्यांदाच प्रवास  प्रवास करत आहे. यापूर्वी 2009 मध्ये ती हबल स्पेस टेलीस्कोपच्या स्पेस शटलच्या दुरुस्तीसाठी गेली होती. म्हणजेच, सुमारे 12 वर्षानंतर, ती पुन्हा अंतराळात प्रवास करेल. तर, आम्ही मानवी अंतराळ यानाच्या सुवर्ण युगात जगत असल्यासारखे वाटत आहे, अशी भावना थॉमस पिस्केट यांनी म्हटले व्यक्त केली आहे.   

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com