''चीनपासून सावध राहा आणि भारताशी हातमिळवणी करा...''; अमेरिकेचा पाकिस्तानला सल्ला

Pakistan Army Chief Syed Asim Munir: पाकिस्तानी लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान हा सल्ला देण्यात आला आहे.
Asim Munir
Asim MunirDainik Gomantak

America Warns Pakistan To Contain China And Go Close To India: चीनसोबतच्या वाढत्या मैत्रीवर अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान हा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला चीनला इकॉनॉमिक कॉरिडॉरपर्यंत मर्यादित ठेवण्यास सांगितले. याशिवाय भारताबरोबर व्यापार सुरु करण्याचा सल्लाही अमेरिकेकडून देण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की, चीनने अलीकडेच पाकिस्तानमध्ये सुरक्षा चौक्या स्थापन केल्या. याबाबतच आता अमेरिकेने पाकिस्तानला हा सल्ला दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानने अमेरिकेची साथ सोडून चीनशी मैत्री केली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून पाकिस्तानचा चीनकडे पूर्वीपेक्षा अधिक कल वाढला आहे. एकीकडे चीनने चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केला आहे आणि दुसरीकडे सुरक्षा चौक्याही उभारल्या आहेत. पाकिस्तानच्या विद्यापीठांमध्येही चीनचा प्रभाव वाढला आहे. त्याने प्रतिष्ठित कायदे-ए-आझम विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमध्ये कन्फ्यूशियस केंद्रे स्थापन केली आहेत. चीनने अलीकडेच पाकिस्तानकडे मागणी केली आहे की, ग्वादरमध्ये काम करणाऱ्या आपल्या नागरिकांना लष्करी चौक्यांमध्ये राहण्याची सोय करावी.

Asim Munir
Pakistan Terrorist: पाकिस्तानात आता CRPF वरील हल्ल्याचा मास्टरमाइंड ढेर; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा एकापाठोपाठ होतोय खात्मा

दुसरीकडे, ग्वादर बंदर बलुचिस्तानमध्ये येते, जिथे मोठ्या संख्येने चिनी नागरिक काम करतात. येथील चिनी नागरिक आणि कर्मचाऱ्यांवर बलुच बंडखोरांनी अनेकदा हल्ले केले आहेत. चीनने आपल्या लढाऊ विमानांसाठी ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करण्याची मागणीही केली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लोम यांनी सप्टेंबरमध्ये ग्वादर बंदराला भेट दिली होती. याबाबत अमेरिकेने या माध्यमातून पाकिस्तानशी राजनैतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Asim Munir
Pakistan: लतीफ, कुद्ददूस, कैसर आणि आता 'रहिमुल्ला'; भारतविरोधी दहशतवादी पाकिस्तानात होतायेत ढेर!

तसेच, या संदर्भात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेला सल्ला आता चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगतो. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या ग्वादर बंदरालाही चीन आर्थिक मदत करत आहे. 2015 पासून या कॉरिडॉरचे काम सुरु आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानला निधी देऊ केल्याचे वृत्त आहे, पण त्यासाठी काही अटी मान्य कराव्या लागतील असेही त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानलाही भारताशी लवकरात लवकर चर्चा सुरु करावी लागेल, असे ते म्हणाले. एलओसीवर शांतता ठेवून व्यापार सुरु करावा, असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com