Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Seattle Food Festival Shooting Latest Update: अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रिय 'बाइट ऑफ सिएटल' फूड फेस्टिव्हलदरम्यान अचानक झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली.
Seattle Food Festival Gunfire
Seattle Food Festival GunfireDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रिय 'बाइट ऑफ सिएटल' फूड फेस्टिव्हलदरम्यान अचानक झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली. स्पेस नीडलजवळील सिएटल सेंटर परिसरात झालेल्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन वर्षीय बालकासह पाच जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास अचानक सलग गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला अनेकांना फटाक्यांचा आवाज असल्याचा भास झाला. मात्र काही क्षणांतच लोक जखमी होऊन खाली कोसळू लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. हजारो नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी दुकाने, इमारती आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

Seattle Food Festival Gunfire
Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

अनेकजण जखमी

घटनेची माहिती मिळताच सिएटल पोलिस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी मृतांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. जखमींमध्ये दोन वर्षीय बालक, 23 वर्षीय युवक तसेच इतर काही प्रौढांचा समावेश आहे. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून इतरांवर उपचार सुरू आहेत.

फूड फेस्टिव्हलमध्ये गोळीबार

'बाइट ऑफ सिएटल' हा शहरातील लोकप्रिय वार्षिक खाद्य महोत्सव असून यासाठी स्थानिक नागरिकांसह मोठ्या संख्येने पर्यटकही उपस्थित असतात. गोळीबार झाला तेव्हा परिसरात हजारो लोक होते. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने संपूर्ण परिसर रिकामा करून घटनास्थळ सील केले आहे.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सिएटल सेंटर परिसरापासून दूर राहावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Seattle Food Festival Gunfire
Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

पुन्हा एकदा अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

या घटनेनंतर अमेरिकेतील सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरक्षा अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात असून या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींबाबतची माहिती स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com