Modi Ji Thali Video: पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी खास थाळी लॉन्च, पाहा काय आहेत मेन्यू

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून या कालावधीत आपल्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत.
Modi Ji Thali
Modi Ji ThaliTwitter/ @ANI
Published on
Updated on

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून या कालावधीत आपल्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक प्रकारचे मोठे करारही होऊ शकतात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यापूर्वी, न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटने पीएम मोदींच्या नावाने थाळी लॉन्च केली आहे.

रेस्टॉरंटचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने एक थाळी लॉन्च करण्यात आली आहे, ज्याला 'मोदी जी थाळी' असे नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जील बायडन पाहुणे म्हणून गेल्यानंतर न्यू जर्सीस्थित एका रेस्टॉरंटने पंतप्रधान मोदींच्या नावाने थाळी लॉन्च केली.

Modi Ji Thali
Joe Biden In Ukraine: जो बायडन अचानक पोहोचले युक्रेनमध्ये, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

थाळीमध्ये काय आहे खास

रेस्टॉरंटचे मालक कुलकर्णी म्हणाले की, "भारतीय समुदायाच्या मागणीनुसार आम्ही मोदीजींच्या नावाने खास थाळी बनवली आहे. या थाळीमध्ये रसगुल्ला, सरसो का साग, आलू दम सब्जी, ढोकळा, ताक, पापड, खिचडी इ. आहे.''

ते पुढे म्हणाले की, आपल्या भारतीय लोकांना थालीपीठ खूप आवडते.' दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या काही भारतीय समुदायाने थाळी उत्कृष्ट असल्याचे सांगितले. एका व्यक्तीने सांगितले की, न्यू जर्सीमध्ये मोदीजी थाळीला पसंती दिली जात आहे. आम्हा सर्वांना ती खूप आवडली आहे.

राजकीय दौरा म्हणजे काय?

एखाद्या देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राजा दुसऱ्या देशाला अधिकृत भेट देत असेल तर त्याला राजकीय भेट असे म्हणतात. या दौऱ्याचा सर्व खर्च यजमान देशाकडून केला जातो.

त्याचवेळी, देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राजा यांना राज्याच्या प्रमुखाद्वारे राजकीय भेटीसाठी आमंत्रित केले जाते. यादरम्यान, पाहुण्यांना 21 तोफांची सलामी दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com