America Crime News: अमेरिकेतील एका डॉक्टरवर आपल्या रुग्णांचा शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 200 हून अधिक महिला आणि अनेक पुरुषांनी डॉक्टरवर शारीरिक छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. बोस्टनचे डॉक्टर डेरिक टॉड यांनी शारीरिक तपासणीच्या नावाखाली रुग्णांचा विनयभंग केला आणि आवश्यक नसलेल्या चाचण्या केल्या असा आरोप आहे.
डॉ. डेरिक टॉड हे बोस्टनमधील एका रुग्णालयात नोकरी करत होते, परंतु आरोपांनंतर त्यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये काढून टाकण्यात आले होते. आरोपी डॉक्टरवर पेल्विक फ्लोअर थेरपी, पुरुषांच्या अंडकोषांची तपासणी अशा रुग्णांच्या अनावश्यक चाचण्या केल्याचा आरोप आहे. 2010 पासून टॉड आपल्या रुग्णांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. मॅसॅच्युसेट्सच्या सफोक सुपीरियर कोर्टात डॉक्टराविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. ब्रिघम रुग्णालयासोबतच चार्ल्स रिव्हर मेडिकल असोसिएशन या अन्य रुग्णालयालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
दरम्यान, 2023 मध्ये डॉक्टरांवर हे आरोप करण्यात आले होते आणि अनेक महिला रुग्णांनी याबाबत तक्रारीही केल्या होत्या. प्रकरण वाढल्याने आरोपी डॉक्टरला रजेवर पाठवण्यात आले आणि नंतर त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. या प्रकरणी रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, या आरोपांमुळे ते अत्यंत त्रस्त आहेत. रुग्णालयानेही तपासात सहकार्य करत आहे. पीडितांमध्ये किशोरवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंतचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.