प्रकृती ठिक नसल्यामुळे परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानात येण्याची परवानगी देण्यासाठी काही स्थानिकांनी आवाज उठवला जात आहे. 'माजी लष्करी शासक जनरल परवेझ मुशर्रफ यांना त्यांचे उर्वरित आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी त्यांच्या मायदेशी परतण्यात कोणताही अडथळा नसावा." असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. परवेझ मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. आणि 2019 मध्ये राज्यघटना निलंबित केल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Pervez Musharraf Pakistan)
1999 ते 2008 या काळात पाकिस्तानवर राज्य करणाऱ्या मुशर्रफ यांच्या पुनरागमनावर संरक्षणमंत्र्यांनी ट्विट केले. पाकिस्तानचे सरंक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी लिहिले की, 'जनरल मुशर्रफ यांची बिघडत चाललेली तब्येत पाहता त्यांना मायदेशी परतण्यात कोणताही अडथळा नसावा. याबाबतीत भूतकाळातील घटनांचा हस्तक्षेप होवू न देता त्यांनी पाकिस्तानात यावे. अल्लाह त्यांना चांगले आरोग्य देवो आणि त्यांच्या जीवनाचा हा काळ सन्मानाने जावो.'
मायदेशी परतल्यावर शाहबाज सरकारमधील पहिले विधान
पाकिस्तानात पहिल्यांदाच शाहबाज शरीफ सरकारच्या मंत्र्याने परवेझ मुशर्रफ यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. मुशर्रफ यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती. 'ते व्हेंटिलेटरवर नसून ते गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात होते. अॅमायलोइडोसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आणि कठीण टप्प्यातून जात आहे जिथून बरे होणे कठीण आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा,'असे ट्विट करून माहिती दिली होती.
डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले की, परवेझ अॅमिलायडोसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याचे 2018 मध्ये ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगने जाहीर केले होते. अमायलोइडोसिस हा एक दुर्मिळ आजार आहे, जो शरीराच्या अवयवांमध्ये असामान्य प्रथिने तयार झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे शरीराचे अवयव सामान्यपणे कार्य करू शकत नाहीत.
2016 पासून मुशर्रफ पाकिस्तानात परतले नाहीत
30 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांच्यावर संविधान निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला होता. 17 डिसेंबर 2019 रोजी विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांच्याविरुद्धच्या देशद्रोहाच्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. नंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. परवेझ मार्च 2016 मध्ये उपचारासाठी दुबईला गेले तेव्हापासून ते पाकिस्तानला परतले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.