‘All Eyes On Rafah’ मोहिमेस Instagram वर 5 कोटी लोकांचं समर्थन; जाणून घ्या कोणी केली पहिली पोस्ट

All Eyes On Rafah: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध गेल्या सात महिन्यांपासून सुरु आहे. इस्त्रायल बिलकुल गाझावरील हल्ले थांबवण्यासाठी तयार नाहीये.
All Eyes On Rafah
All Eyes On RafahDainik Gomantak

All Eyes On Rafah: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध गेल्या सात महिन्यांपासून सुरु आहे. इस्त्रायल बिलकुल गाझावरील हल्ले थांबवण्यासाठी तयार नाहीये. सातत्याने इस्त्रायल गाझावर हवाई हल्ल्यांसह जमीनी कारवाई करत आहे. नुकताच इस्त्रायलने हमासशासित राफाह शहरावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर जगभरातून इस्त्रायलवर टिकेची झोड उठली. परंतु इस्त्रयलवर या टिकेचा काही एक फरक पडलेला दिसत नाहीये. इस्त्रायल (Israel) सातत्याने हमासला संपवण्याची भाषा बोलत आहे. दरम्यान, राफाह शहरावरील इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर जगभरात सोशल मीडियावर एक मोहिम छेडली गेली. ‘All Eyes On Rafah’ ही मोहिम सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात राबवण्यात आली. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांसह जगातील दिग्गज लोकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला.

दुसरीकडे, All Eyes On Rafah ही सोशल मीडियावर अशी स्टोरी बनली की जवळजवळ प्रत्येक यूजरने ती पाहिली असेल. ही स्टोरी शेअर करणाऱ्या लोकांची संख्या 50 दशलक्ष म्हणजेच 5 कोटींच्या पुढे गेली आहे. गाझामध्ये होत असलेली मानवतावादी हानी थांबवण्याचे आवाहन करणाऱ्या लोकांनी ही स्टोरी मोठ्या प्रमाणावर शेअर केली. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, या स्टोरीमध्ये असे काय होते जी इतक्या लोकांनी शेअर केली, कोणी ही मोहिम राबवली आणि ती मोहिम सुरु करण्याचा उद्देश काय होता? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

All Eyes On Rafah
Israel Hamas War: ‘’7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा...’’; ‘ऑल आइज ऑन राफाह’ मोहिमेवर भडकला इस्त्रायल

सोशल मीडियावर (Social Media) शेअर होत असलेल्या फोटोमध्ये काही टेंट दिसत आहेत. ज्यावर एक मोठ्या अक्षरात ‘All Eyes On Rafah’ असे लिहिले आहे. हा फोटो AI द्वारे मलेशियन इंस्टा यूजर shahv4012 ने तयार केला. मंगळवारी राफाहमधील नागरी छावणीवरील इस्रायली हल्ल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. पोस्ट शेअर करताच जगभरातील लोकांचे लक्ष या पोस्टने वेधले. दुसरीकडे, या पोस्टच्या विरोधात इस्रायल-समर्थित सोशल मीडिया यूजर्संनीही अनेक ट्रेंड चालवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, हा ट्रेंड शेअर करण्याचा उद्देश केवळ गाझामध्ये घडणाऱ्या घटनांवर लक्ष केंद्रित करणे नाही तर पॅलेस्टिनी समस्यांवर पॅलेस्टिनी लोकांशी सहमती व्यक्त करणे हा आहे. ही पोस्ट अधिकाधिक लोकांनी शेअर केली. त्यांना ही पोस्ट पाहून आश्चर्य वाटेल असेल की, राफाहमध्ये काय चालले आहे? सोशल मीडियाच्या युगात पाश्चात्य मीडियाच्या अजेंड्याला विरोध करण्यासाठी आणि पॅलेस्टिनी लोकांवरील अत्याचार जगासमोर आणण्यासाठी असे ट्रेंड प्रभावी ठरतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

All Eyes On Rafah
Israel Hamas War: अनेकजण जिवंत जळाले, गाझा नंतर राफाहमध्ये इस्रायली नरसंहार; 24 तासांत 160 जणांचा मृत्यू

shahv4012 यूजर्स कोण आहे?

shahv4012 या युजरबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, मात्र त्याच्या इंस्टाग्रामवरुन मिळालेल्या माहितीनुसार तो मलेशियन नागरिक असून त्याला फोटोग्राफीची आवड आहे. या ट्रेंडबद्दल, त्याच्या इंस्टा कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Road to 50M'. याशिवाय, त्याच्या बायोमध्ये इस्लामिक रिलीफची लिंक देखील दिली आहे, ज्यामध्ये पॅलेस्टाईनसाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com