
अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबान (Taliban) या दहशतवादी संघटनेच्या विरोधात आता अफगाणिस्तानमधील लोक हळू हळू एकत्र येताना दिसता आहेत. तालिबानच्या विरोधात लढलेल्या अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने आता तालिबान या दहशतवादी संघटनेविरोधात बंड पुकारले आहे. अहमद मसूदने (Ahmad Massoud) तालिबानविरुद्ध पुकारलेल्या या युद्धात जगाकडून सुद्धा मदत मागितली आहे. एका माध्यमाशी केलेल्या संवादात अहमद मसूद म्हणाला की, 'आमचे मुजाहिद्दीन पुन्हा एकदा तालिबानशी लढायला तयार आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा आहे.'
अफगाणिस्तान नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचे नेते अहमद मसूद यांनी तालिबानविरोधातील संघर्ष सुरू ठेवण्याची घोषणा करून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची हिंमत दाखवल्याचे बोलले जाते आहे.
तालिबानच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर अहमद मसूद असेही म्हणाले की,’तालिबानच्या विरोधात भुमिका घेतल्यानंतर माझ्या आवाहनावर अनेक लोक एकत्र आले आहेत. लष्कराचे अनेक जवानही माझ्याबरोबर आहेत ज्यांना शस्त्र खाली ठेवल्याबद्दल राग आहे. तसेच, अहमद मसूदने हे सुद्धा कबूल केले की, तालिबानशी यशस्वी लढा देण्यासाठी आम्ही पुरेसे नाही, त्यामुळे त्याने इतर देशांनाही मदतीचे आवाहन केले आहे. पुढे बोलताना त्याने असेही सांगितले की, तालिबान हा केवळ अफगाणिस्तानचा नाही तर संपूर्ण जगाचा शत्रू आहे कारण, तालिबान्यांच्या ताब्यात असलेला अफगाणिस्तान दहशतवाद्यांचा गड बनेल.
अहमद मसूद व्यतिरिक्त, अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही तालिबानविरोधातील संघर्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. सालेह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'ज्या लाखो लोकांनी मला निवडले त्यांना मी निराश करणार नाही. मी कधीच तालिबानसोबत असणार नाही.’ तर दुसर्या ट्वीटमध्ये सालेह यांनी लिहिले की, 'तालिबान विषयी अमेरिकेशी बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. आम्हा अफगाणिस्तानच्या नागरिकांना हे सिद्ध करावे लागेल की, अफगाणिस्तान काही व्हिएतनाम नाही. अफगाणिस्तानने अजुनही तालिबानविरुद्ध लढण्याची हिंमत गमावलेली नाही.
दरम्यान, सालेह हे भुमिगत होण्यापुर्वी सर्वात शेवटी काबुलच्या इशान्येस असलेल्या पंजशीरमध्ये आढळून आले होते. तालिबानचा मुकाबला करण्यासाठी गोरील्ला वॉरफेअरसाठी सालेह आणि मसूदची मुले पंजशीरमध्ये एकत्र येत असल्याचे देखील समजते आहे. पंचशीर खोरे 1990 च्या गृहयुद्धात कधीच तालिबानच्या ताब्यात आले नाही, किंवा एक दशकापूर्वी (तत्कालीन) सोव्हिएत युनियनला देखील ते जिंकता आले नव्हते. आम्ही तालिबानला पंजशीरमध्ये प्रवेश करू देणार नाही असा विश्वास आजही पंजशीरच्या स्थानिकांमध्ये आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.