तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, परंतु ते पंजशीरपर्यंत अजून पोहोचले नाहीत. ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अहमद मसूद. ज्याचे वडील अहमद शाह मसूद यांना 'सिंह ऑफ पंजशीर' म्हटले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली, उत्तर आघाडीचे सेनानी तालिबानला कडवी टक्कर देत असून प्रत्येक आघाडीवर (Ahmad Massoud Army) तालिबान्यांना प्रतिकार करावा लागत आहे. दरम्यान, मसूद तालिबान्यांना काही शरण येण्याची चिन्हं दिसत नसताना दुसरीकडे मसूद म्हटले की, आम्ही तालिबानसमोर कदापि आत्मसमर्पण करणार नाही.
अहमद मसूद म्हणाले की, आम्ही तालिबानला शरण जाणार नाही, परंतु त्यांच्याशी वार्तालाप करण्यास तयार आहे. त्यांची एक मुलाखत बुधवारी फ्रेंच मासिकात प्रकाशित झाली आहे. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह हे काबुलच्या उत्तरेस असलेल्या पंजशीर खोऱ्यात अहमद मसूद (Ahmad Massoud and Amrullah Saleh) सोबत तालिबान्यांनविरोधात लढा देत आहेत. तालिबानच्या अफगाण कब्जानंतर मुलाखती दरम्यान मसूद म्हणाले की, आत्मसमर्पण करण्यापेक्षा मरणे पसंत करेन. मी अहमद शाह मसूदचा मुलगा आहे. माझ्या डिक्शनरीत शरण सारखा शब्द नाही.
कोणीही पंजशीर काबीज करु शकला नाही
मसूदने दावा केला की "हजारो" पुरुष पंजशीर खोऱ्यात त्याच्या उत्तर आघाडीत सामील झाले आहेत. कोणीही पंजशीरवर कब्जा करु शकत नाही. माझ्या वडिलांनी 1979 मध्ये सोव्हिएत आक्रमणाच्या वेळीही हे ठिकाण किल्ल्यासारखे ठेवले होते, जे कोणीही त्यावर कब्जा करु शकले नव्हते. 1996-2001 च्या दरम्यान ना सोव्हिएत युनियन इथे पोहोचू शकले ना तालिबान इथे आले. मात्र, या मुलाखतीदरम्यान मसूद यांनी पुन्हा एकदा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनसह इतर परदेशी नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच योग्य वेळी शस्त्र न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
'अमेरिकन शस्त्रे तालिबानच्या हातात आहेत'
अहमद मसूद म्हणाले, 'आठ दिवसांपूर्वी काबूलमध्ये ज्यांच्याकडून मी शस्त्र मागितली होती, त्या लोकांची ऐतिहासिक चूक मी विसरु शकत नाही. त्यांनी नकार दिला. आणि या शस्त्रांमध्ये तोफखाना, हेलिकॉप्टर, अमेरिकन बनावटीच्या टाक्यांचा समावेश होता, जे सध्या तालिबानच्या हातात आहेत. आम्ही बोलणी करु शकतो, युद्धांमध्ये सर्व प्रकारची बोलणी होते. आणि माझे वडील देखील नेहमी या शत्रूंशी आवश्यक परस्थिती बोलले होते.
अहमद शाह मसूदला अल कायदाने मारले
"कल्पना करा की तालिबान महिला, अल्पसंख्यांक अधिकार, लोकशाही आणि खुल्या समाजाच्या तत्त्वांना स्वीकारण्यास तयार आहे.," ते पुढे म्हणाले, मग या तत्त्वांमुळे त्यांचा आणि उर्वरित अफगाणिस्तानचा कसा फायदा होईल हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न का करु नये? '' मसूदच्या वडिलांचे पॅरिस आणि इतर पाश्चिमात्य देशांशी जवळचे संबंध होते. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानवर सोव्हिएत कब्जा केला आणि 1990 च्या दशकात तालिबानी राजवटीशी लढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना 'पंजशीर का शेर' (Ahmad Shah Massoud Assassination) हे टोपणनाव त्यांना मिळाले. 11 सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याच्या दोन दिवस आधी 2001 मध्ये अल-कायदा या दहशतवादी संघटनेने त्यांची हत्या केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.