चीनकडून भारतीयांना भेट! 18 महिन्यांनंतर व्हिसा प्रक्रिया सुरू

18 महिन्यांनंतर चीनने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांच्या व्हिसा अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Visa Application
Visa ApplicationDainik Gomantak
Published on
Updated on

18 महिन्यांनंतर चीनने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांच्या व्हिसा अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चीनने नोव्हेंबर 2020 पासून भारतीय आणि भारतात येण्याऱ्या-जाण्याऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती. दिल्लीतील चिनी दूतावासाने त्यांच्या वेबसाइटवर एक नोटीस जारी केली, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, चीनला भेट देणारे परदेशी नागरिक आणि त्यांच्यासोबतचे कुटुंबातील सदस्य सर्व क्षेत्रातील काम आणि उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करू शकता. (After 18 months China has resumed the visa application process for Indian nationals)

Visa Application
अदानी ग्रुप आणि पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीलंकन ​​अधिकाऱ्याचा राजीनामा

त्यांच्या महाविद्यालयात जाण्यासाठी वाट पाहणारे भारतीय विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करू शकतात की नाही यासंदर्भात आणखी स्पष्टपणे नमूद केले नाही. मात्र पर्यटन आणि इतर वैयक्तिक कारणांसाठी व्हिसा अर्ज तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले. मार्चमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत भेटीदरम्यान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्हिसा सुरू करण्याबाबत याआधीही बोलले होते.

जयशंकर यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर चीनने काही भारतीय विद्यार्थ्यांना परत येण्याची परवानगी दिली होती आणि चीनमध्ये परतणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रसार भारतीच्या म्हणण्यानुसार, भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने हाताळला जातो आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय दूतावास आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्याचा प्रश्न चिनी अधिकाऱ्यांसमोर सातत्याने मांडत आहे.

Visa Application
पैगंबरावरील वक्तव्य हा आमच्यासाठी मुद्दा नाही, बांगलादेशच्या मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

चीन विद्यार्थ्यांना व्हिसा देत नसल्याबद्दल भारत सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. एप्रिलमध्ये भारत सरकारने चिनी नागरिकांचे टुरिस्ट व्हिसा निलंबित केले होते. एका अहवालानुसार, चिनी विद्यापीठात सुमारे 22,000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व्हिसा न मिळाल्याने त्यांचा अभ्यास थांबला होता. अभ्यास रखडल्याने विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक ताण, आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com