भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेली टिप्पणी ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे बांगलादेशच्या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे. सौदी अरेबिया, इराणसह अनेक देशांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भारत सरकारकडे कारवाईची मागणी केली असताना देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसन महमूद यांनी ही टिप्पणी केली आहे. (comment on prophet mohammad is not a big issue for us says bangladesh minister)
बांगलादेशचे (Bangladesh) मंत्री म्हणाले की, बांगलादेशात हा फार मोठा मुद्दा नाही. यासोबतच बांगलादेश सरकार या मुद्द्यावर तडजोड करत असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. ढाकामध्येही काही संघटनांनी10 जून रोजी या मुद्द्यावर निदर्शने केली होती.
ते म्हणाले की, 'भारत (India) सरकारने या मुद्द्यावर केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो.'
महमूद म्हणाले की, 'पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेले कोणतेही वक्तव्य निषेधार्ह आहे. मीडियाशी बोलताना मेहमूद म्हणाले की, या प्रकरणी भारतात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्या आधारावर कठोर कारवाई केली जाईल अशी आम्हाला आशा आहे.'
दुसरीकडे, या मुद्द्यावर कट्टरतावाद्यांनी सरकारकडून हलगर्जीपणा दाखवल्याच्या आरोपावर ते म्हणाले की, ''बांगलादेश सरकार कोणतीही तडजोड करत नाही. बांगलादेश सरकार मुहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर कोणतीही तडजोड करत नाही आणि करणार नाही. मी स्वतः याचा निषेध केला आहे.''
बांगलादेशी मंत्री म्हणाले - आमच्यासाठी अरबाइतका मुद्दा नाही
या मुद्द्यावर सरकारने जाहीर निवेदन जारी केले नसल्याच्या प्रश्नावर महमूद म्हणाले की, 'ही आपल्या देशाची अंतर्गत बाब नाही. हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे.' ते पुढे म्हणाले की, 'बांगलादेशात हा एवढा मोठा मुद्दा नाही, जितका अरब देश, पाकिस्तान (Pakistan) आणि मलेशियामध्ये आहे.'
महमूद पुढे म्हणाले, 'जगात कुठेही पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात काही घडले तर त्याचा निषेध व्हायला हवा. कायदेशीर कारवाईसाठी आम्ही भारत सरकारचे अभिनंदन करतो.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.