'प्लेबॉय' इम्रान खानने कंडोमवर लावला कर, बिलावल भुट्टो संतापत म्हणाले...

देशात गरिबी इतकी वाढली आहे की, इम्रान खान (Imran Khan) सरकारला गर्भनिरोधकांवरही कर लावावा लागला आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानात कोरोनाचा विस्फोट झाला असताना दुसरीकडे अनेक पाकिस्तानी नागरिकांचा रोजगारही गेला आहे. यातच देशात गरिबी इतकी वाढली आहे की, इम्रान खान सरकारला गर्भनिरोधकांवरही कर लावावा लागला आहे. खरं तर, बुधवारी नॅशनल असेंब्लीमध्ये वित्त विधेयक 2021 अंतर्गत इम्रान खान (Imran Khan) सरकारने 144 वस्तूंवर 17 टक्के दराने जीएसटी (GST) लागू केला. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला.

दरम्यान, जेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांनी गर्भनिरोधकांवरही कर लावण्याची घोषणा केल्यावर हा गोंधळ वाढला. या गोंधळात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बिलावल म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान सरकार पाकिस्तानसाठी (Pakistan) या शतकातील सर्वात मोठी शोकांतिका बनले आहे. पूरक वित्त विधेयक 2021 अंतर्गत, इम्रान खान सरकारने गर्भनिरोधक देखील सोडले नाही.

Imran Khan
अफगाणिस्तानात आर्थिक संकट, कामगारांना पैशाऐवजी मिळतेय धान्य

इम्रान खानसारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती: बिलावल

बिलावल भुट्टो एवढ्यावरच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, गर्भनिरोधकांवरही कर लावण्यात आला असून इम्रान खानसारख्या खेळाडूकडून असे निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. ही काही हास्यास्पद बाब नाही. तुम्ही पाकिस्तान तसेच बांगलादेश (Bangladesh) आणि भारताकडे (India) पहा जिथे लोकसंख्येचा स्फोट होत आहे. ते पुढे म्हणाले, तुम्ही लोकांच्या मुलभूत गरजा, त्यांचे खाणेपिणे, रोजगार, त्यांचे आरोग्य आणि शिक्षण पुरवू शकत नाही. परंतु तुम्ही गर्भनिरोधकांवर कर लावणार आहात का?

पाकिस्तानात महागाईचे वादळ येणार : बिलावल

बिलावल पुढे म्हणाले की, वित्त विधेयकांतर्गत, इम्रान खान सरकारला 144 वस्तूंवर 17 टक्के दराने जीएसटी लावून 360 अब्ज रुपये वसूल करायचे आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे देशात महागाईचे वादळ उठणार आहे. बिलावल म्हणाले पुढे की, इम्रान खान सरकारला पेट्रोल, डिझेल, मोटारसायकल, सायकल, फोन, इंटरनेट, लॅपटॉप आणि प्रीपेड कॉलिंग कार्डवरील कर वाढवायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com