अफगाणिस्तानातील परिस्थिती सहा महिन्यांत बदलेल: राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी

तालिबान्यांपासून (Taliban) शहरांची सुरक्षा ही आमच्या सरकारची पहिली प्राथमिकता आहे.
Afghanistan President Ashraf Ghani
Afghanistan President Ashraf GhaniDainik Gomantak

अमेरिकी आणि नाटो सैन्य अफगाणिस्तानमधून (Afghanistan) बाहेर पडल्यानंतर तालिबान (Taliban) आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात संघर्ष सुरु झाला. याच पाश्वभूमीवर आता अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी (President Ashraf Ghani) यांनी म्हटले आहे की, युद्धग्रस्त देशाची परिस्थिती येत्या सहा महिन्यांत बदलेल. तालिबानपासून अफगाणिस्तानमधील शहरांची सुरक्षा ही आमच्या सरकारची पहिली प्राथमिकता आहे. व्हर्चुअल मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधित करताना घनी रविवारी म्हणाले की, तालिबान गेल्या दोन दशकांमध्ये अधिक क्रूर आणि दमनकारी बनला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अफगाण सुरक्षा दलांमधील युद्ध तीव्र झाले आहे. सुरक्षा दल तालिबानला कडवी झुंज देत आहेत.

Afghanistan President Ashraf Ghani
अफगाणिस्तान होणार दुसरे 'सौदी अरेबिया'; देशात खनिजांचा प्रचंड साठा

अशरफ घनी पुढे म्हणाले, " शांती, समृद्धी किंवा प्रगतीशी काहीही संबंध नाही. आम्हाला शांतता हवी आहे, पण त्यांना आत्मसमर्पण हवे आहे. युद्धभूमीवरील परिस्थिती बदलल्याशिवाय ते अर्थपूर्ण चर्चा करणार नाहीत. म्हणूनच आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. यासाठी देशव्यापी एकत्रीकरण आवश्यक आहे. '' राष्ट्रपती घनी यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले जेव्हा रविवारी अफगाण सुरक्षा दलांनी तालिबान लढाऊ आणि त्यांच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला, ज्यामुळे देशाच्या प्रमुख शहरांवर त्याचा ताबा मिळू शकला नाही.

Afghanistan President Ashraf Ghani
अफगाणिस्तान विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केलेला फरारी जॉँटी कोईआ गजाआड

कंधार विमानतळावरील हल्ला

रविवारीच तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार येथे असलेल्या विमानतळावर तीन रॉकेटने हल्ला केले. कंधार हे एकेकाळी तालिबानचा गड होता. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगाण सुरक्षा दलांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी रॉयटर्सला सांगितले की, कंधार विमानतळाला आमच्याकडून लक्ष्य करण्यात आले कारण शत्रू त्याचा वापर आमच्यावर हवाई हल्ले करण्यासाठी बेस म्हणून वापर करत होता. हल्ल्यामुळे विमानतळाची धावपट्टी अंशतः खराब झाली. त्यामुळे विमानतळावरुन होणारी उड्डाणे स्थगित करण्यात आली.

Afghanistan President Ashraf Ghani
अफगाणिस्तान विद्यार्थ्याला मारहाण  

हवाई हल्ल्यात 200 तालिबान लढाऊ ठार झाले

तालिबान लढाऊंनी हेलमंड आणि हेरातमधील लष्कर गाहसह अन्य दोन प्रांतीय राजधानींवरही हल्ला केला आहे. सरकारने म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलांनी (ANDSF) देशभरात शेकडो तालिबानी अतिरेक्यांना ठार केले आहे. हेरातमध्ये अमेरिकेच्या हवाई दलाच्या बी -52 विमानाने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 200 तालिबान लढाऊ ठार झाले. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी गझनी, कंधार, फराह, जोझजान, बल्ख, समगन, हेलमंद, तखार, कुंदुज, बागलाण, काबूल आणि कपिसा प्रांतात तालिबानच्या विरोधात कारवाई आणि प्रतिहल्ले तीव्र केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com