पाकिस्तानात अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ, जगभरातून इम्रान सरकारवर टीका

नुकत्याच आलेल्या EASOच्या अहवालात स्पष्ट झाले आहे की,पाकिस्तानातील कट्टरपंथी संघटना देशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहेत.
Attacks on minorities on rise in Pakistan
Attacks on minorities on rise in PakistanDainik Gomantak

भारताचा शेजारी पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्या दाव्याच्या उलट देशात अल्पसंख्याकांवरील (Minorities) अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हिंदू, शीख, ख्रिश्चन, अहमदिया आणि शिया मुस्लिमांच्या हत्या, ईशनिंदा आणि जबरदस्तीने धर्मांतर आणि द्वेषयुक्त भाषणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे युरोपियन एक्सीलियम सपोर्ट ऑफिस (EASO) ने आपल्या अहवालात म्हटले आहे.(Attacks on minorities on rise in Pakistan world leaders criticize Prime Minister Imran Khan

नुकत्याच आलेल्या EASOच्या अहवालात स्पष्ट झाले आहे की,पाकिस्तानातील कट्टरपंथी संघटना देशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहेत. ऑक्टोबर 2020 मधील 'पाकिस्तान-सुरक्षा स्थिती' या EASO COI अहवालाची ही अद्यतनित आवृत्ती आहे. त्यात म्हटले आहे की 2020 आणि वर्ष 2021 च्या पहिल्या सात महिन्यांत तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, अल कायदा, इस्लामिक स्टेट-खोरासान आणि हक्कानी नेटवर्क सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये जास्त सक्रिय होत्या आणि त्यांनी दहशतवादी या संघटनांनी अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. या दहशतवादी संघटनांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य करून आयईडी स्फोट, आत्मघाती हल्ले, त्यांचे अपहरण, ग्रेनेड आणि रॉकेट हल्ले आणि तोडफोड यासारख्या घटना घडवून आणल्या आहेत. अहवालानुसार, 2020 आणि 2021 च्या पहिल्या सहामाहीत पाकिस्तानमधील हिंसाचारात 344 लोक मारले गेले असल्याचे देखील समोर आले आहे .

एक वृत्त संस्थेच्या रिपोर्टनुसार 2019 मध्ये, 26,500 पाकिस्तानी लोकांनी आश्रयासाठी अर्ज केला आहे , तर जानेवारी ते सप्टेंबर 2020 दरम्यान, ही संख्या सुमारे 12,000 होती. कोविड-19 साथीच्या आजारामुळे 2019 च्या तुलनेत जानेवारी ते सप्टेंबर 2020 मध्ये आश्रयासाठी अर्ज करणाऱ्या लोकांच्या संख्येत 37 टक्क्यांनी घट झाली आहे. पाकिस्तानींना ओळखण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे.

Attacks on minorities on rise in Pakistan
जपानच्या पंतप्रधानांनी फायनल बाजीही मारली

तर दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या देखील अपंग असलेला पाकिस्तान जागतिक न्याय प्रकल्पाच्या कायद्याचे नियम निर्देशांक 2021 च्या क्रमवारीत 139 देशांपैकी 130 व्या क्रमांकावर आहे. दहशतवाद्यांचे स्थान असलेल्या या देशात कायद्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. हे यावरून समजत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कोत्री येथे अज्ञात व्यक्तींनी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली होती . या घटनेनंतर स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्ने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी दिवाळीपूर्वी मंदिराची तोडफोड करून लूट केली. मूर्ती फोडून हल्लेखोरांनी लाखो रुपयांची रोकड व इतर मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केले होते . या घटनेमुळे इथे देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्याच्या आश्वासनाची पोल खोल झाली होती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com