Afghanistan: बानूमध्ये जिल्हाप्रमुखांसह 300 तालिबानी ठार

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) बागलाण प्रांतातील (Baglan Province) अंद्राबमध्ये तालिबान आणि विरोधी लढाऊ यांच्यात भीषण लढाई सुरु आहे.
Taliban
TalibanDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल (Kabul) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) आपले सरकार बनवण्याची तयारी केली आहे, परंतु अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये तालिबान लढाऊ आणि अफगाणिस्तान सैन्यांमध्ये युध्द सुरु आहे. अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतातील (Baglan Province) अंद्राबमध्ये तालिबान आणि विरोधी लढाऊ यांच्यात भीषण लढाई सुरु आहे. अफगाणिस्तानच्या लष्कराने बानू जिल्ह्यात तालिबानचे कंबरडे मोडले आहे. तालिबानच्या जिल्हा प्रमुखांसह 300 तालिबानी ठार झाले आहेत. यासह, सुमारे 20 तालिबान लढाऊंनाही कैद करण्यात आले आहे.

तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे, ट्विटद्वारे पंजशीर प्रोेव्हिन्सने सांगितले आहे. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सतत संघर्ष सुरु आहे. फजर परिसरात 50 तालिबान मारले गेले आणि 20 जणांना कैदी बनवण्यात आले. यापूर्वी बगलाण प्रांतातच अफगाण सैन्याने 300 तालिबानांचा खात्मा केला होता. बीबीसीच्या पत्रकार यल्दा हकीम यांनी ट्विट करत सांगितले होते की, बागलाणच्या अंद्राबमध्ये लपलेल्या तालिबानींवर हा मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यात त्यांनी 300 तालिबान मारल्याचा दावा तालिबानविरोधी लढवय्यांनी केला आहे.

Taliban
व्लादिमीर पुतीन यांनी अफगाण निर्वासितांना म्हटलं, 'दहशतवादी'

तालिबानने अफगाणिस्तानच्या 34 पैकी 33 प्रांत ताब्यात घेतले आहेत. राजधानी काबूल 15 ऑगस्ट रोजी तालिबान लढाऊंनी ताब्यात घेतले, त्यानंतर लवकरच सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला. तालिबान लढाऊंपासून फक्त पंजशीर दूर आहे. तालिबानचे लढाऊही आदल्या दिवशी पंजशीरमध्ये हल्ला करण्यासाठी तेथे पोहोचले होते. कट्टर संघटनेने माहिती दिली होती की, त्यांचे अनेक शेकडो लढाऊ पंजशीरला पोहोचत आहेत.

Taliban
Video: तुर्कीने अफगाण निर्वासितांना रोखण्यासाठी सीमेवर उभारली भिंत

पंजशीर काबीज करण्याच्या तयारीत असलेल्या तालिबानला अमरुल्ला सालेह (Amarullah Saleh) आणि अहमद मसूद (Ahmed Masood) विरोध करत आहेत. दोघांच्या सैन्याने तालिबान्यांना परत हाकलण्यासाठी पूर्णपणे रणनीती आखली आहे. रविवारी एका मुलाखतीत अहमद मसूद म्हणाले होते की, ते लढणार नाही, पंरतु कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला आमचा विरोध असणार आहे. ते पुढे म्हणाले की, जर तालिबानशी चर्चा अयशस्वी झाली तर युद्ध टाळता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com