अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर लाखो अफगाण नागरिकांनी शेजारी असणाऱ्या देशांमध्ये पलायन करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता तुर्कीला अफगाण निर्वासितांच्या आगमनाची भीती वाटत असल्याने, अफगाणिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांना रोखण्यासाठी तुर्कीने आपल्या इराणच्या सीमेवर भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीने आपल्या इराण सीमेवर 295 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या 5 किमी काम शिल्लक राहीले आहे. तुर्कीमध्ये आधीच लाखो सीरियन निर्वासित आहेत.
अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता हिंसाचार असूनही तुर्की काबूल विमानतळाचे संचालन करण्यास तयार आहे. तुर्कीने म्हटले आहे की, अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि नाटो सैन्याच्या माघारीनंतर काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रक्षण करेल. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले आहे की, ते तालिबानच्या राजकिय हेतूवर लक्ष ठेवून आहेत.
किंबहुना अफगाणिस्तानात तालिबानच्या कारवाया वाढल्यापासून अफगाण नागरिक मोठ्या संख्येने इतर शेजारी असणाऱ्या देशांमध्ये आश्रय घेत आहे. काही अफगाणीही तुर्कीमध्ये पळून आले आहेत. अफगाणिस्तानमधील या संकटाबद्दल संयुक्त राष्ट्रही चिंतित आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी तालिबान आणि इतर सर्व पक्षांना जीव वाचवण्यासाठी आणि अफगाण नागरिकांना मानवतावादी मदत पुरवण्यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
त्याचवेळी, संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघ शांततापूर्ण उपाययोजनांमध्ये योगदान देण्यास, सर्व अफगाणिणींच्या, विशेषतः महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि गरजू नागरिकांना जीवनरक्षक मानवतावादी मदत देण्याचा निर्धार केला आहे. ओसीएचए म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 550,000 लोकांना यावर्षी संघर्षामुळे विस्थापित झाल्यावर 550,000 लोकांना आधीच मदतीची गरज आहे. मे महिन्यापासून हा आकडा दुप्पट झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.