Afghanistan: 'लग्नानंतरही रोज रात्री माझ्यावर बलात्कार होतो', अफगाण मुलीचा Video Viral

Ilaha Dilwajiri: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून गुन्हेगारीची एकापेक्षा एक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत.
Ilaha Dilwajiri
Ilaha DilwajiriDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून गुन्हेगारीची एकापेक्षा एक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. ताजं प्रकरण एका मुलीचं आहे, जिच्यावर रोज बलात्कार होत होता. काबुल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी इलाहा दिलवाजिरीने दावा केला आहे की, 'तालिबानचे माजी प्रवक्ते कारी सईद खोस्ती यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केले. त्यांनी माझा छळ करुन बलात्कार केला.' ट्विटरवर व्हायरल झालेल्या लीक व्हिडिओमध्ये दिलवाजिरीने हा दावा केला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. दुसरीकडे, कारी सईद खोस्ती यांनी बलात्काराचा दावा फेटाळून लावला आहे. खोस्ती यांनी मुलीला घटस्फोट (Divorce) देण्यामागे 'गैर-इस्लामिक मान्यता' हे कारण सांगितले. त्याचबरोबर खोस्त यांनी आपण तिला मारले नाही, असे सांगितले.

Ilaha Dilwajiri
Afghanistan: TTP कंमाडर उमर खालिद खोरासानीसह 4 दहशतवादी ठार

दुसरीकडे, आमना न्यूज इंग्लिश या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर इलाहा दिलवाजिरी रडतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यावर 30 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. व्हिडीओमध्ये दिलवाजिरी रडताना दिसत आहे. तिने खोस्ती यांच्यावर बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला.

Ilaha Dilwajiri
Afghanistan Earthquake: भूकंपाने घेतला 1000 हून अधिक लोकांचा बळी

तसेच, बळजबरीने लग्नाआधीही खोस्ती यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा इलाहाचा आहे. इलाहाने सांगितले की, 'एकदा कंटाळून मी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तोरखाम सीमेवर मला पकडण्यात आले.' यानंतर पीडितेने सईद खोस्ती यांच्याकडे सुटकेची भीक मागितली. दुसरीकडे, व्हिडिओमध्ये इलाहा दावा करताना दिसत आहे की, 'खोस्ती यांनी आपल्याशी जबरदस्तीने लग्न केले.' सईदसोबत लग्न झाल्यापासून रोज रात्री तिच्यावर बलात्कार, मारहाण आणि अत्याचार होत आहेत.

शिवाय, या व्हिडिओनंतर इलाहाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये खोस्ती दोन साथीदारांसह तिच्या घरात घुसताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, कारी सईद खोस्ती यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, इलाहाच्या विनंती वरुन मी तिच्याशी लग्न केले. खोस्ती यांनी पुढे सांगितले की, जेव्हा मला समजले की, इलाहा "धर्मावर विश्वास ठेवत नाही" तेव्हा मी तिला घटस्फोट दिला.' शेवटी खोस्ती यांनी इलाहावर कुराणाचा अपमान करुन ईशनिंदा केल्याचा आरोपही केला.

Ilaha Dilwajiri
Taliban In Afghanistan: तालिबान महिलांच्या हक्कांवर पुन्हा अंकुश

त्याचबरोबर, खोस्ती यांनी ट्विट करत म्हटले की, "6 महिन्यांपूर्वी मी इलाहाशी तिच्या सांगण्यावरुन लग्न केले, त्यानंतर मला समजले की, ती धर्माला मानत नाही. मी सल्लामसलत आणि चर्चेद्वारे तिला धर्मानुसार आचरण करण्यास सांगितले, परंतु ते कामी आले नाही. तिने पवित्र कुराणचा अपमान केला.''

Ilaha Dilwajiri
Afghanistan: तालिबान्यांचा नवा फर्मान, टिकटॉक अन् PUBG वर घातली बंदी

खोस्तींनी पुढे असेही सांगितले की, ''मी तिला मारहाण केली नाही. कायदेशीररित्या तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला." ट्विटरवर व्हिडिओ समोर आल्यापासून अनेकांनी खोस्ती आणि तालिबान (Taliban) या दोघांनाही लक्ष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com