German Dictator Adolf Hitler: जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या घराला पोलिस स्टेशन बनवण्याची तयारी सुरु आहे. ऑस्ट्रियाच्या गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्वतः हिटलरला आपले घर सरकारी इमारतीत बदलायचे होते. अलीकडेच एका डॉक्युमेंटरीमध्येही हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच ऑस्ट्रिया सरकारच्या या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, अनेक वर्षांच्या कायदेशीर संघर्षानंतर ऑस्ट्रिया सरकारने हिटलरच्या घराचे पोलीस ठाण्यात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस ठाण्यात ‘मानवी हक्क प्रशिक्षण केंद्र’ही उभारण्यात येणार आहे.
या वर्षी 2 ऑक्टोबरपासून हे काम सुरु होणार आहे. हिटलरचे घर जर्मनीला लागून असलेल्या ऑस्ट्रियातील ब्रानौ शहरात आहे. 1889 मध्ये हिटलरचा जन्म येथे झाला.
वास्तविक, ब्रानौ शहर पूर्णपणे जर्मनीला लागून आहे. येथे एक नदी ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या सीमांना विभाजित करते. अलीकडच्या काळात दोन्ही देशांमध्ये निओ-नाझी वाढले आहेत.
त्यांच्यासाठी हिटलरचे ब्रानौ येथील घर म्हणजे तीर्थक्षेत्र बनले आहे. यामुळे सरकार याला पोलिस स्टेशन बनवत आहे. 2016 मध्येच ऑस्ट्रिया (Austria) सरकारने हिटलरच्या घराच्या मालकाकडून इमारतीचा ताबा घेतला होता.
दुसरीकडे, हिटलरच्या घराचे पोलीस ठाण्यात रुपांतर करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने ज्या पद्धतीने घेतला आहे, तो हुकूमशहाच्या इच्छेनुसारच आहे, असे ऑस्ट्रियाचे संचालक गुंटर श्वाइगर यांनी म्हटले आहे.
10 मे 1939 रोजी प्रकाशित झालेल्या स्थानिक वृत्तपत्राचा हवाला देत श्वाइगर म्हणाले की, हिटलरची नेहमीच इच्छा होती की त्याचे वडिलोपार्जित घर सरकारी कार्यालयात रुपांतरित व्हावे.
तसेच, हिटलरच्या घराचे पोलीस ठाण्यात रुपांतर करणे म्हणजे सरकारी कार्यालयात रुपांतरित करण्याच्या हुकूमशहाच्या इच्छेची पूर्तता होईल, असे गुंटर श्वाइगर म्हणाले. सरकारने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली.
ऑस्ट्रियन दिग्दर्शक या महिन्याच्या अखेरीस हिटलरच्या घराविषयी एक डॉक्युमेंटरीही प्रदर्शित करणार आहेत, ज्यामध्ये या घराशी संबंधित अशी काही रहस्ये समोर आणली जातील, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही.
हिटलरचे घर 800 स्क्वेअर मीटरचे आहे, ज्याची सध्याची किंमत 170 कोटी रुपये आहे. घर रस्त्याच्या कडेला त्रिकोणाच्या आकारात आहे. शासनाच्या वतीने पोलीस ठाणे (Police Station) बांधण्याचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.
2026 पासून ते कार्यान्वित केले जाईल. तथापि, हिटलरने या घरात (House) फार कमी वेळ घालवला. पण तरीही हे घर पाहण्यासाठी जगभरातून नाझी समर्थक पोहोचतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.