चिनी अधिकाऱ्याची अमेरिका,ऑस्ट्रेलियाला 'महायुद्धा'ची धमकी

चीनचे अधिकारी व्हिक्टर गाओ यांनी म्हटले आहे की, तैवानसोबतच्या लष्करी संघर्षाच्या वेळी जर त्याचे मित्र ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका त्याच्या संरक्षणासाठी पुढे आले तर महायुद्ध अटळ आहे
Chines diplomat warns USA & Australia on Taiwan issue
Chines diplomat warns USA & Australia on Taiwan issue Dainik Gomantak
Published on
Updated on

चीनच्या (China) कुरापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत. चीनच्या एका माजी अधिकाऱ्याने अमेरिका (USA) आणि ऑस्ट्रेलियाला (Australia) 'महायुद्धा' (World War)ची धमकी दिली आहे. चीनचे अधिकारी व्हिक्टर गाओ यांनी म्हटले आहे की, तैवानसोबतच्या (Taiwan) लष्करी संघर्षाच्या वेळी जर त्याचे लोकशाही मित्र ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका त्याच्या संरक्षणासाठी पुढे आले तर महायुद्ध अटळ आहे . गाओ यांनी एकदा कम्युनिस्ट नेते डेंग झियाओपिंग यांचे भाषांतरकार म्हणून काम केले आहे पण आता ते चीन सरकारचे मुखपत्र बनले आहेत . त्यांनी पाश्चात्य शक्तींना तैवानला जोडण्याच्या चीनच्या इराद्यापासून दूर राहण्याचा इशारा देखील दिला आहे.(Chines diplomat warns USA & Australia on Taiwan issue)

तैवान 1949 मध्ये चीनच्या मुख्य भूभागापासून वेगळे झाले होते. तेथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते आहेत आणि ते बीजिंगच्या एकीकरणाला आणि निरंकुश शासनाला कडाडून विरोध करतात. परंतु अध्यक्ष शी जिनपिंग यांनी वारंवार सांगितले आहे की गरज भासल्यास चीनच्या महान कायाकल्पाचा भाग म्हणून 2027 पर्यंत तैवानला जोडण्यासाठी लष्करी शक्ती वापरण्याची त्यांची योजना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गेल्या महिन्यात वचन दिले होते की चीनकडून तैवान जिंकण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास अमेरिकन सैन्य तैवानच्या बाजूने उभे राहील.

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनीही तैवानवर हल्ला झाल्यास अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन सैन्य अमेरिकेला साथ देतील, असे वक्तव्य केले होते. या विधानांमुळे व्हिक्टर गाओ संतप्त झाले आहेत, ज्यांना चीनचे वुल्फ वॉरियर मुत्सद्दी म्हणून पाहिले जाते.त्यांनी याला उत्तर देताना 'ज्यांना एकीकरण थांबवायचे आहे ते अपयशी ठरतील.' असे सांगितले आहे. 'चीनची मुख्य भूमी आणि चीनचे तैवान यांच्यातील पुनर्मिलनासाठी चीनच्या मिशनमध्ये जर ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या सैन्यासोबत लढायला गेला तर तुम्ही अपयशी ठराल' असे सांगतानाच त्यांनी या दोन्ही देशांना 'महायुद्ध'ची धमकी दिली आहे.

Chines diplomat warns USA & Australia on Taiwan issue
या देशात लस न घेतलेल्या लोकांसाठी 'लॉकडाऊन'

चीन आधीपासूनच तैवानला आपला भाग मानतो आणि म्हणून बीजिंग त्याला आपल्या देशाचा भाग बनवण्याच्या बेतात आहे. दुसरीकडे, तैवान एक लोकशाही बेट आहे, जिथे लोकांना चीनपेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. गृहयुद्धात तैवान चीनपासून वेगळे झाले होते . तैवानचे अमेरिका, जपान आणि पाश्चात्य देशांशी चांगले संबंध आहेत. तसेच अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे तैवानने खरेदी केली आहेत. याशिवाय सेमीकंडक्टर चिप बनवणारा देश म्हणूनही तैवानची ओळख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com