जो बायडेन यांच्या सुरक्षेत त्रुटी, विमान नो फ्लाय झोनमध्ये दाखल

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या डेलावेअर घराच्या हवाई हद्दीत एक खाजगी विमान कोसळले.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

शनिवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या डेलावेअर घराच्या हवाई हद्दीत एक खाजगी विमान कोसळले. त्यामुळे काही काळ राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या निवासस्थानातून हटवले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणताही धोका नसल्याचे व्हाईट हाऊसने माध्यमांना सांगितले आणि तातडीने खबरदारीचे उपाय देखील केले. परिस्थितीची पडताळणी झाल्यानंतर, बायडेन आणि त्यांची पत्नी जिल रेहोबोथ, समुद्रकिनार्यावर त्यांच्या घरी परतले. (A private plane crashed in the airspace of President Joe Biden Delaware home)

Joe Biden
शाहबाज शरीफ यांच्याविरोधात एफआयआर दाखल; लाहोर न्यायालयाचा आदेश

सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की, हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर ताबडतोब प्रतिबंधित क्षेत्रातून विमान हटवण्यात आले आहे. एजन्सीने सांगितले की ते त्या पायलटला भेटून त्याच्याशी बोलतील. प्राथमिक तपासानुसार पायलट योग्य रेडिओ चॅनलवर नव्हता. तो पायलट विमान वाहतूक नियमांचेही पालन करत नव्हता. जेव्हा अध्यक्ष वॉशिंग्टन सोडतात तेव्हा फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन फ्लाइट निर्बंध जाहीर करत असते.

या घटनेबाबत अधिक माहिती देताना, युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसचे संपर्क प्रमुख अँथनी गुग्लिल्मी यांनी सांगितले की, दुपारी 1 च्या सुमारास एका खाजगी विमानाने चुकून सुरक्षित क्षेत्रात प्रवेश केला आणि रेहोबोथ डेलावेअरमधील प्रतिबंधित हवाई हद्दीतमध्ये प्रवेश केला. काही वेळातच हे विमान प्रतिबंधित हवाई हद्दीतून बाहेर काढण्यात यश आले. पायलट योग्य रेडिओ चॅनलवर नव्हता, NOTAMS पाळत नव्हता आणि निर्धारीत मार्गाचा अवलंब देखील करत नव्हता असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस या प्रकरणाबाबत पायलटची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Joe Biden
भारतीय वंशाच्या हरिणीने जिंकली नॅशनल स्क्रिप्स स्पेलिंग बी स्पर्धा

ऑगस्ट 2017 च्या सुरुवातीला, रशियन हवाई दलाच्या जेटने यूएस कॅपिटल, पेंटागॉन, सीआयए मुख्यालय आणि जॉइंट बेस अँड्र्यूजवरून उड्डाण केले होते. उड्डाण कराराचा एक भाग होता जो अमेरिका, रशिया आणि इतर देशांच्या लष्करी विमानांना 34 स्वाक्षरीदार देशांच्या लष्करी ठिकाणांची तपासणी करण्यासाठी हवाई निरीक्षण उड्डाणे उडवण्याची परवानगी देत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com