भारतीय वंशाच्या हरिणीने जिंकली नॅशनल स्क्रिप्स स्पेलिंग बी स्पर्धा

यंदाची नॅशनल स्क्रिप्स स्पेलिंग बी (National Scripts Spelling B) ही स्पर्धा भारतीय वंशाच्या हरिणी लोगनने जिंकली आहे.
Harini Logan
Harini LoganDainik Gomantak
Published on
Updated on

यंदाची नॅशनल स्क्रिप्स स्पेलिंग बी ही स्पर्धा भारतीय वंशाच्या हरिणी लोगनने जिंकली आहे. सॅन अँटोनिया, टेक्सास येथील 14 वर्षीय हरिणी 8वीतील विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेत फक्त 8 वी पर्यंतची मुलेच सहभागी होतात. हरिणीचा शेवटचा सामना भारतीय वंशाचा डेन्व्हरचा रहिवासी असलेल्या विक्रम राजू या इयत्ता 7 वीतल्या विद्यार्थ्याशी (Students) झाला. शेवटच्या फेरीच्या स्पेल ऑफमध्ये हरिणीने 90 सेकंदात 22 शब्द अचूक उच्चारुन विजय मिळवला. हरिणीला 50 हजार आणि उपविजेत्या विक्रम राजूला 25 हजार डॉलर मिळाले. (indian origin harini logan national scripps spelling bee winner)

उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या प्रेरणेने

स्पेलिंग बीनुसार, अंतिम फेरीच्या सामन्यासाठी 234 मुले मेरीलँडमध्ये (Maryland) पोहोचली. एक वेळ अशी आली होती की, 'पुल्युलेशन' या शब्दाचा नेमका अर्थ न सांगू शकल्यामुळे स्पर्धेतून आऊट झाले. नंतर एका जजसने हस्तक्षेप करत सांगितले की, या शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि हरिणीने दिलेला अर्थही योग्य आहे.

Harini Logan
"आंतरराष्ट्रीय संबंधातही व्होट बँकेचे राजकारण...": US रिपोर्टची भारताने केली निंदा

लोगानचे प्रशिक्षक ग्रेस वॉल्टर यांनी सांगितले की, ती खूप हुशार मुलगी आहे. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास ती तयार असते. नवीन शब्द शिकण्याव्यतिरिक्त, तिला सर्जनशील लेखन, पियानो आणि रेकॉर्डर वाजवणे आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com