कॅनडात कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'लॅम्डा' आढळला

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेला 'लॅम्डा विषाणू' (Lambda virus) कॅनडामध्ये (Canada) आढळून आला आहे.
Lambda virus
Lambda virusDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेला 'लॅम्डा विषाणू' (Lambda virus) कॅनडामध्ये (Canada) आढळून आला आहे. परंतु या विषाणूचा प्रसार आत्तापर्यंत किती प्रमाणात झालेला आहे अद्याप समजलेले नाही. कॅनडाच्या प्रमुख आरोग्य अधिरकारी डॉ. थेरेसा टॅम (Dr. Theresa Tam) यांनी यावेळी सांगितले की, लॅम्डा विषाणूचे आत्तापर्यंत 11 रुग्ण सापडले असून हा विषाणू पेरु देशात मागील वर्षी सापडला होता.

क्युबेकमध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या मते, या नव्या व्हेरिएंटचे 27 रुग्ण सापडले होते. तसेच सार्वजिनक आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, आम्ही कोरोनाचा नवा व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असून तो कोरोना लसीला किती आणि कसा प्रतिसाद देतो याचा अभ्यास करण्यात येत आहे. त्याचबरोबर आम्ही या नव्या विषाणूबाबत माहिती गोळा करीत आहोत. सध्या तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे.

Lambda virus
कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचा WHO चा उपक्रम सुरु

न्यूयॉर्क युनिव्हरसिटी द्वारा आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासात 2 जुलैला असे सांगण्यात येत आहे की, एमआरएनए लसींनी तयार केलेल्या प्रतिपिंडानाही हा विषाणू कोणत्याही प्रकारची दाद देत नाही. मॉडर्ना आणि फायझर या लीस एमआरएनए स्वरुपाच्या असून प्रतिपिंडाना हा विषाणू अजिबातच प्रतिसाद देत नाही असे म्हणता येणार नाही. फक्त त्या व्हेरिएंटचे प्रमाण कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com