हॉंगकॉंगमधील (Hong Kong) टायफून बंदरामध्ये (Typhoon Shelter) असलेल्या 16 जहाजांना रविवारी सकाळी एका पाठोपाठ एक आग लागली. 10 जहाजं या दुर्घटनेमध्ये पाण्यात बुडाली. तसेच एक व्यक्ती या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमीही झाला आहे. टायफून बंदारामध्ये रात्री 2.30 च्या सुमारास आग लागली. या आगीनं पाहता पाहता रौद्र रुप धारण केलं आणि 16 जहाजांना त्याचा फटका बसला. जवळपास साडेसहा तास ही आग धुमसत राहीली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या आगीमध्ये 16 जहाजांचं नुकसान झालं होतं.
टायफून बंदारामध्ये लागलेली आग आटोक्यात आली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी 35 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. दरम्यान या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. या आगीमध्ये एका जणाचा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले आहे. (A huge fire in a port in Hong Kong 10 ships sank)
स्थानिक अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगा लागल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आगीची व्यापकता पाहता 11 फायर बोट मॉनिटर, 8 जेट घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या चार टीमने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर साडेसहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.