Video: 'हॉट एअर बलून' हवेतच फुटल्याने अमेरिकेत मोठी दुर्घटना

अमेरिकेमधील (America) न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्के (Albuquerque) शहरात हॉट एअर बलून (Hot air balloon) कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.
Hot air balloon
Hot air balloonDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेमधील (America) न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्के (Albuquerque) शहरात हॉट एअर बलून (Hot air balloon) कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे फुगा हवेतच फुटला आणि तीव्र वेगाने खाली पडला. त्यामुळे एअर बलूनमध्ये आनंद लुटणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये पायलट (Pilot) सहित तीन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाला रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. हॉट एअर बलूनमध्ये बसलेल्या व्यक्तींचं साधारण वय हे 40 ते 60 च्या आसपास होतं.

शनिवारी सकाळी सात वाजता ही दुर्घटना घडली आहे. फुगा वर गेल्यानंतर त्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे फुग्याला अचानक आग लागली आणि हवेतच फुटला. त्यानंतर 30 मीटर उंचीवरुन थेट खाली पडला. फुगा हा हवेमध्येच फुटल्यामुळे तो तीव्र वेगाने खाली पडला. या दुर्घटनेचा व्डिडिओ सोशल मिडियावर (social media) प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. (Video Hot air balloon bursts in the air a big accident in America)

Hot air balloon
कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान ड्यूक यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला

प्रशासनाने (administration) या दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातानंतर अल्बुकर्के शहरातील 13.777 ग्राहकांची वीज खंडीत झाली होती. जवळपास 4 तासांच्या परिश्रमानंतर वीज पुन्हा सुरु करण्यात यश आले आहे. हॉट ए्र बलूनला पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुर्घटना झालेल्या भागामध्ये न जाण्याची ताकिद देण्यात आली आहे. दरवर्षी अल्बुकर्के शहरामध्ये एअर बलून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. दरवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 9 दिवस हा कार्यक्रम असतो. या कर्यक्रमाला हजारो लोक आपली उपस्थिती लावतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com