600 वर्षांपूर्वी या देशातून झाला होता 'प्लेग'चा प्रसार, शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा

मानव सभ्यतेच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात उद्भवलेल्या साथीच्या रोगांचा मानवी जीवनावर वाईट परिणाम झाला आहे.
Where did the Black Death originate
Where did the Black Death originateDainik Gomantak
Published on
Updated on

Where did the Black Death originate: मानव सभ्यतेच्या इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात उद्भवलेल्या साथीच्या रोगांचा मानवी जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. कोरोनापूर्वी, स्पॅनिश फ्लू आणि प्लेगसारख्या जागतिक महामारीने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या चर्चेदरम्यान, शास्त्रज्ञांनी प्लेगच्या साथीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. (600 year old graves pinpoint where the black death began from north kyrgyzstan in 14th century)

प्लेगचा प्रसार कुठून झाला?

मध्यपूर्वेतील एका प्रसिद्ध रेशीम व्यापार मार्गाजवळ सापडलेल्या स्मशानभूमीत शेकडो वर्षांपूर्वी सापडलेल्या सांगाड्यांचे परीक्षण करुन, शास्त्रज्ञांनी 14 व्या शतकात ब्लॅक डेथची महामारी कशी सुरु झाली हे शोधून काढले आहे. खरंतर, उत्खननादरम्यान सापडलेल्या सांगाड्यांच्या डीएनए (DNA) तपासणीतून 600 वर्षांहून अधिक जुने रहस्य उघड झाले आहे, ज्याची जगाला आजपर्यंत माहिती नव्हती. विशेष म्हणजे, 14 व्या शतकात प्लेगच्या साथीने जगात प्रचंड विनाश घडवून आणला होता. त्यामुळे त्या काळातही करोडो लोकांचा मृत्यू झाला होता.

Where did the Black Death originate
यूएस फेडरल रिझर्व्हने वाढवलेल्या व्याजदराचा भारतीय बाजारांवर काय परिणाम होईल?

जगातील पहिला प्लेग रुग्ण कधी सापडला?

रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्कॉटलंडमधील स्टर्लिंग विद्यापीठ, जर्मनीतील (Germany) मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट आणि ट्युबिंगेन विद्यापीठाच्या संशोधन पथकाने किर्गिझस्तानमधील स्मशानभूमीतून सापडलेल्या डीएनएचे विश्लेषण केले. त्यामधून असे आढळले की, मध्य आशियामध्ये प्लेगची साथ सुरु झाली. ते 1330 चे दशक होते. शेकडो वर्षांपूर्वी येथे पुरलेल्या लोकांच्या दातांमध्ये प्लेग निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा डीएनए संशोधकांना सापडला आहे. संशोधकांनी असेही सांगितले की, एका दशकापेक्षा कमी कालावधीत ही महामारी (Epidemic) जगभर पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com