यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवले आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्स किंवा 0.75 टक्के वाढ केली आहे. या वाढिमुळे भारतीय बाजारालाही धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतीय चलन रुपया आणखी खाली जाऊ शकतो. (US interest rate hikes)
1994 नंतरची व्याजदरातील सर्वात मोठी वाढ
यूएस फेडरल रिझर्व्हने काल दर वाढवले, 1994 नंतरची व्याजदरातील ही सर्वात मोठी वाढ आहे. या वृत्तानंतर जागतिक बाजारात जोरदार हालचाल होऊ शकते. अमेरिकेतील महागाईचा दर वाढत असल्याने फेडने हा निर्णय घेतला आहे. यूएस मध्ये ग्राहक किंमत चलनवाढ 1981 पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे आणि ती 8.6 टक्के आहे. अन्न आणि ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत ही वाढ अमेरिकेत दिसून आली आहे.
फेडच्या अधिकाऱ्यांनी व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. कर्ज घेण्यासाठी लोकांच्या व्याजदरात वाढ होण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते आणि त्याच धर्तीवर ही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा अमेरिकन शेअर बाजारावर काय परिणाम होईल यावर लक्ष ठेवणार असल्याचेही फेडने म्हटले आहे.
अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्याची शक्यता
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करून येथील वाढता महागाई दर कमी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. दर वाढवण्याच्या आपल्या निवेदनात, मध्यवर्ती बँकेने स्पष्टपणे सांगितले की महागाई दर 2 टक्क्यांवर आणण्यासाठी बॅंक कठोर पावले उचलेल. फेडने असेही अधोरेखित केले आहे की, अमेरिकेत येत्या काही दिवसांत अर्थव्यवस्था मंदावू शकते, इतकेच नाही तर देशातील बेरोजगारीचा दरही आणखी वाढू शकतो.
भारतीय बाजारांवर कसा वाईट परिणाम होईल?
यूएस फेडरल रिझर्व्हच्या दर वाढीमुळे भारतीय बाजारांवरही वाईट परिणाम होण्याची अपेक्षा आहे आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण होऊ शकते. फेडने दर वाढवल्यानंतर डॉलरच्या दरात मोठी वाढ दिसू शकते आणि रुपयाची घसरण आणखी खोल होऊ शकते. इतकेच नाही तर भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरही धोरणात्मक व्याजदर वाढवण्याचा दबाव येवू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.