India-China Crisis: Line of Control वर चीनच्या मोठ्या हालचाली; सॅटेलाइट इमेजद्वारे ड्रॅगनचे कारणामे उघड

China at LAC : भारत आणि चीनमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. चीन तीन बाजूंनी LAC वर एअरफील्ड तयार करत आहे. यामध्ये धावपट्टी, रस्ता, पूल, क्षेपणास्त्र तळाचा समावेश आहे.
Line Of Control.
Line Of Control.Dainik Gomantak.
Published on
Updated on

India-China Crisis: चीनच्या नवनवीन युक्त्या पाहून जणू ते युद्धाच्या तयारीत आहेत असे वाटतेय. होय, एकीकडे गोड भाषा बोलून दिशाभूल करण्याचे धोरण आहे आणि दुसरीकडे चीन मोठ्या एलएसीवर प्रमाणावर बांधकामे करत आहे. जेणे करून त्याला युद्धादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.

उपग्रहावरून मिळालेल्या छायाचित्रांतून चीनच्या नापाक कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे. चीन भारताच्या सीमेवर धावपट्टी, इमारत, लढाऊ विमानांचा निवारा अशी बांधकामे करत आहे. यावरून ते भारताविरुद्ध नवी रणनीती बनवत असल्याचे स्पष्ट होते. विश्वासघात हा चीनच्या स्वभावात आहे.

2020 मध्ये, चीनने गलवान खोरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या पराक्रमी सैनिकांसमोर चीन सैन्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर चिनी सैन्याने आंध्रमधील तवांगमध्ये घुसखोरी केली. पण त्याची माहिती भारताला आधीच मिळाली होती. त्यामुळेच भारताची अत्याधुनिक शस्त्रे तिथे तैनात होती.

चिनी सैनिकांचा अपमान करून सैनिकांनी त्यांना परत धाडले. पण आता तयारीचे जे चित्र समोर आले आहे ते सांगत आहेत की भारताला पूर्वीपेक्षा अधिक सतर्क राहावे लागणार आहे.एका अहवालात म्हटले आहे की चीन ल्हासाजवळ होटन, तिबेटमधील लडाख, हिमाचल प्रदेशजवळील नगारी गुंसा येथे बांधकामाला गती देत ​​आहे.

Line Of Control.
Karnataka High Court : मृतदेहावर बलात्कार गुन्हा नाही: कर्नाटक उच्च न्यायालय

LAC वर धावपट्टी

चीन जी तयारी करत आहे, ते पाहता त्याला हवाई युद्ध करायचे आहे. म्हणूनच तो धावपट्टी, निवारा, इमारत बनवत आहे. धावपट्टीच्या आजूबाजूला बांधकामे सुरू असल्याचे चित्रांमध्ये स्पष्ट दिसत आहे. ते येथे पूल आणि रस्ता बांधत आहेत.

सांगितलेली सर्व तिन्ही ठिकाणे LAC जवळ आहेत. म्हणजेच चीनची योजना अशी आहे की, ते भारताला तिन्ही बाजूंनी घेरण्याची योजना आखत आहे. म्हणजे लडाख, अरुणाचल, हिमाचल. या तीन राज्यांची सीमा LAC चीनला लागून आहे. या ठिकाणी तो सर्व तयारी करत आहे. धोकादायक शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे तैनात करून येथे तळ उभारत आहेत.  

हॉटन एअर फील्ड दक्षिण-पश्चिम शिनजियांगमध्ये आहे. लेहपासून अंतर मोजले तर ते सुमारे 400 किमी असेल. 2020 च्या सॅटेलाइट चित्रात येथे असे कोणतेही बांधकाम दिसत नाही, परंतु 2023 मध्ये जे चित्र समोर आले आहे त्यात बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मोठ्या धावपट्ट्या दिसतात. या धावपट्टीचा वापर फक्त लढाऊ विमानांसाठी केला जातो.

Line Of Control.
Squid Game in Singapore : भारतीय व्यक्ती रातोरात लखपती; स्क्विड गेम्समध्ये जिंकले 11.5 लाख रुपये

गुप्तपणे लढाऊ विमाने तैनात

इतकंच नाही तर भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर चेंगडू J-20 लढाऊ विमान गुप्तपणे येथे तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. यावर कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तिबेटमधील नगारी गुंसा एअरफील्ड, जिथे चीन पायाभूत सुविधा वाढवत आहे, पॅंगॉन्ग लेकपासून सरळ रेषेत 200 किलोमीटर अंतरावर आहे. हा तोच भाग आहे जिथे चिनी सैनिकांनी अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com