India-Canada: संतापजनक व्हिडिओ व्हायरल, खलिस्तान समर्थकांकडून तिरंग्याची जाळपोळ

18 जून रोजी कॅनडातील सरे, ब्रिटीश कोलंबिया येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती. त्याला भारताने दहशतवादी म्हणून जाहिर केले होते.
Khalistan supporters protest outside the Indian Embassy in Vancouver.
Khalistan supporters protest outside the Indian Embassy in Vancouver.Dainik Gomantak
Published on
Updated on

Outrageous video goes viral, Indian Flag Tricolor burnt by Khalistan supporters Outside Indian Consulate in Vancouver:

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर डझनभर खलिस्तान समर्थकांनी भारत सरकार विरोधात निदर्शने केली.

यावेळी आंदोलकांनी खलिस्तानचे झेंडे फडकावले आणि घोषणाबाजी केली. त्यापैकी काहींनी भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर तिरंग्याची जाळपोळ केली. टोरंटोमध्येही अशीच निदर्शने झाली.

यावेळी खलिस्तानी आंदोलकांनी निज्जरच्या हत्येची सार्वजनिक चौकशी करण्याची मागणी केली, असे कॅनडातील सीटीव्ही न्यूजने म्हटले आहे. दरम्यान कॅनडातील अनेक शहरांमध्ये खलिस्तान समर्थकांनी आंदोलनाचे आयोजन केले होते.

जागतिक शीख संघटनेचे अध्यक्ष तेजिंदर सिंग सिद्धू यांनी एका निवेदनात हरदीप सिंग निज्जरच्या मारेकऱ्यांना शोधण्याची मागणी केली. ते पुढे म्हणाले, "समुदायातील सदस्यांना असुरक्षित वाटत असल्यास किंवा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न दिसत असल्यास, आम्ही त्यांना ताबडतोब कायद्याच्या अंमलबजावणीशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित करतो," असे सीटीव्ही न्यूजने वृत्त दिले आहे.

तत्पूर्वी, खलिस्तान समर्थकांनी नियोजित केलेल्या निषेधाच्या आधी व्हँकुव्हर पोलिस विभागाने व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या आसपासचा रस्ता बंद केला होता.

व्हॅनकुव्हरच्या हॉवे स्ट्रीटवरील इमारतीतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रवेशद्वारावर अडथळे आणण्यात आले होते, असे सीटीव्ही न्यूजने वृत्त दिले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 18 सप्टेंबर रोजी कॅनडात खलिस्तान टायगर फोर्सचे प्रमुख हरदीपसिंग निज्जर याच्यावर झालेल्या जीवघेण्या गोळीबारात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची नुकतेच म्हणाले की, खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताच्या सहभागा आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत.

18 जून रोजी कॅनडातील सरे, ब्रिटीश कोलंबिया येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या करण्यात आली होती. त्याला भारताने दहशतवादी म्हणून जाहिर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com