Algeria: अल्जेरियात चित्रकाराची हत्या; तब्बल 49 जणांना फाशीची शिक्षा

आग लावल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी केली हत्या
Court
CourtDainik Gomantak

अल्जेरियातील जंगलात लागलेल्या आगीत एका चित्रकाराची जमावाने हत्या केली. याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी (दि.25) तब्बल 49 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आगीचे वृत्त समजताच चित्रकार जमेल बेन इस्माईल (38) यांनी लारबा नाथ इराथन गावात मदत करण्यासाठी धाव घेतली. गावकऱ्यांनी इस्माईल यांना बाहेरचा माणूस समजून, त्यांनीच आग लावल्याचा संशय व्यक्त करत त्याची निर्घृण हत्या केली.

(49 people sentenced to death for mob killing in Algeria)

Court
PNB: पंजाब नॅशनल बँकेचे नाव बदला? याचिकाकर्त्याला सरन्यायाधीश म्हणाले उद्या तुम्ही...

ईशान्य अल्जेरियाच्या काबिली प्रदेशात ऑगस्ट 2021 मध्ये ही हत्येची घटना घडली आणि अवघ्या देशाला धक्का बसला. बर्बर भागात लागलेल्या आगीत बचाव कार्यात सहभागी असलेल्या लष्कराच्या जवानांसह 90 जणांचा मृत्यू झाला. चित्रकार जमेल बेन इस्माईलच्या हत्येमध्ये 100 हून अधिक संशयितांचा सहभाग होता.

Court
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा? भाजप अक्रामक

न्यायालयाने याप्रकरणी दोषी आढळलेल्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे. पण, या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, कारण अल्जेरियामध्ये अनेक दशकांपासून फाशीच्या शिक्षेवर बंदी आहे. तसेच, अल्जेरियन न्यायालयाने आणखी 38 जणांना 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com