पंजाब नॅशनल बँकेचे नाव बदलण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालायाचा नकार दिला आहे. नाव बदलण्याची याचिका फालतू असल्याचे सांगत न्यायालायाने याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याचे युक्तिवादही फालतू आणि निरर्थक आहेत. यावर सुनावणी होऊ शकत नाही कारण हा धोरणात्मक विषय आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे.
( Supreme Court dismisses PIL to change name of Punjab National Bank, Bank of Baroda)
सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यावर ताशेरे ओढले आहेत. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला पंजाब नॅशनल बँकेला काय नाव द्यावे? उद्या तुम्ही बँक ऑफ बडोदाचे नाव बदलण्याची मागणी करू शकता. नाव बदलण्याचा असा आदेश देणारे आम्ही कोण? उद्या तुम्ही म्हणाल की भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलले पाहिजे. अशा शब्दात सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला सुनावले आहे.
बँकेचे नाव बदलणे सध्याची गरज आहे. निरक्षर लोकांना या फक्त पंजाब किंवा बडोद्याच्या बँका आहेत? असे वाटते असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. यावर पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी तिथे फक्त पंजाबीतच बोलत असतील असे तुम्हाला वाटते का? ही पूर्णपणे फालतू आणि निराधार याचिका आहे. आम्ही ती फेटाळून लावतो. असे सरन्यायाधीश म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.