Luis Diaz: फुटबॉलपटूच्या आई-वडिलांचे दहशतवाद्यांनी केले अपहरण; माहिती देणाऱ्यास 40 लाखाचे बक्षीस

Liverpool FC Luis Diaz's Parents Kidnapped: सुटकेसाठी स्थानिकांचा मोर्चा
Liverpool FC Luis Diaz's Parents Kidnapped
Liverpool FC Luis Diaz's Parents KidnappedDainik Gomantak
Published on
Updated on

Luis Diaz's Parents Kidnapped by Terrorist: लॅटिन अमेरिकन देश कोलंबिया येथील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लुईस डियाज याच्या आई-वडिलांचे नॅशनल लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटनेने अपहरण केले आहे. कोलंबिया सरकारनेच हा खुलासा केला आहे.

डियाझच्या आई-वडिलांचे शनिवारी संध्याकाळी कोलंबियातील बॅरँकास शहरातील पेट्रोल पंपावरून अपहरण झाले होते.

तथापि, अपहरणानंतर पोलिसांनी काही तासांत डियाजच्या आईची सुटका केली. तर त्याचे वडील मॅन्युअल मात्र अजुनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

Liverpool FC Luis Diaz's Parents Kidnapped
Jasprit Bumrah: वर्ल्डकपमध्ये बुमराहचा जलवा! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत झहिर-मॅकग्राच्या यादीत मानाचं स्थान

लुईस हा कोलंबिया फुटबॉल संघाचा खेळाडू असण्यासोबतच तो इंग्लिश क्लब लिव्हरपूल एफसीकडूनही खेळतो. अपहरणाबाबत समजताच लुईस इंग्लंडहून कोलंबियाला परतला आहे.

दरम्यान, लुईसच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी स्पेशल फोर्स तैनात करण्यात आली आहे. दलाच्या म्हणण्यानुसार, ज्या वाहनातून अपहरण झाले ते एका डोंगराळ, घनदाट जंगलात सापडले. डियाजच्या वडिलांची माहिती देणाऱ्यास 40 लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी देऊ केले आहे.

दरम्यान, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्या सरकारने डियाजच्या वडिलांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारच्या वतीने शिष्टमंडळाचे प्रमुख ओटी पॅटिनो यांनी सांगितले की, डायझच्या वडिलांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी.

आम्ही नॅशनल लिबरेशन आर्मीला आठवण करून देऊ इच्छितो की अपहरण हा गुन्हा आहे आणि युद्धाच्या कायद्याविरुद्ध आहे. करारानुसार दहशतवाद्यांनी हे करू नये.

Liverpool FC Luis Diaz's Parents Kidnapped
कॅनडा दरवर्षी पाच लाख स्थलांतरितांना देणार प्रवेश, भारतीयांना मिळणार सर्वाधिक लाभ

नॅशनल लिबरेशन आर्मी ही कोलंबियाची दहशतवादी संघटना असून त्यात 2500 सदस्य आहेत. ही संघटना 1964 पासून व्हेनेझुएलाजवळ सक्रिय आहे.

डियाझ 2022 मध्ये लिव्हरपूल क्लबमध्ये सामील झाला. डायझ एक विंगर आहे आणि त्याने यावर्षी 11 सामन्यांमध्ये 3 गोल आणि 1 असिस्ट केला आहे. डियाझ हा संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

कोलंबियातील बॅरँकास शहरातील रहिवाशांनी लुईस डायझच्या वडिलांच्या सुटकेच्या मागणीसाठी मंगळवारी शेकडो लोकांनी मोर्चा काढला होता. यावेळी लुईस-मॅन्युएल डियाझचे चित्र असलेले पांढरे टी-शर्ट लोकांनी घातले होते तसेच "स्वातंत्र्य" चे नारे दिले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com