Mumbai Attack Mastermind Killed: मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा पाकिस्तानात खात्मा! लश्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा मृत्यू; जेवणात विष कालवल्याचा संशय

Qari Saeed Abdul Aziz Dead Pakistan: 26/11 हल्ल्याचा कट रचणाऱ्या प्रमुख गुन्हेगारांपैकी एक आणि लश्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर कारी सईद अब्दुल अजीज याचा पाकिस्तानमध्ये अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
Qari Saeed Abdul Aziz Dead Pakistan
Mumbai Attack Mastermind KilledDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Attack Mastermind Killed Pakistan: मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेदनादायी आठवणी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताज्या आहेत. शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे आणि देशाचे मोठे नुकसान करणारे दहशतवादी अजूनही पाकिस्तानात उघडपणे वावरताना दिसतात. या भीषण हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद आजही पाकिस्तानमध्ये आरामात राहून भारतविरोधी विधाने करत विष पेरण्याचे काम करतोय.

मात्र याचदरम्यान पाकिस्तानमधून (Pakistan) एक अशी बातमी समोर आली, ज्यामुळे मुंबई हल्ल्यातील पीडितांच्या जखमांवर काही प्रमाणात फुंकर घातली गेली. 26/11 हल्ल्याचा कट रचणाऱ्या प्रमुख गुन्हेगारांपैकी एक आणि लश्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर कारी सईद अब्दुल अजीज याचा पाकिस्तानमध्ये अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

Qari Saeed Abdul Aziz Dead Pakistan
Pakistan Child Abuse Report: लहान मुलांसाठी पाकिस्तान नरक! बाल शोषणाच्या बाबतीत लाजिरवाणा रेकॉर्ड; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

कारी सईद अब्दुल अजीज हा लश्कर-ए-तैयबाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य कमांडर मानला जात होता. तो अशा नेटवर्कचा मुख्य भाग होता, जे जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम करायचा. त्यांच्याशी सतत संपर्क राहून भारतात दहशतवाद जिवंत ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात त्याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर तो भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर सतत होता. दीर्घकाळापासून भारतीय तपास संस्था त्याचा शोध घेत होत्या.

Qari Saeed Abdul Aziz Dead Pakistan
Pakistan Army: 'पाकिस्तानी लष्कर दहशतवादी संघटनेसारखं...', पत्रकाराचा दावा; आसिम मुनीरबाबत माजी लष्करप्रमुखाची 'ती' चेतावणी ठरली खरी

मिळालेल्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील एका मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ अब्दुल अजीज अचानक कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, मशिदीत पोहोचण्यापूर्वी काही वेळ आधी त्याने एका अज्ञात ठिकाणी जेवण केले होते. त्याच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या जेवणात काही विषारी पदार्थ मिसळण्यात आले होते का, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

Qari Saeed Abdul Aziz Dead Pakistan
Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

त्याचा मृत्यू अचानक आणि गूढ पद्धतीने झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे पाकिस्तानकडून या मृत्यूच्या अधिकृत कारणाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. अब्दुल अजीजचा हा संशयास्पद मृत्यू अशा वेळी झाला, जेव्हा गेल्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये लश्कर-ए-तैयबाशी संबंधित अनेक बड्या दहशतवाद्यांच्या अज्ञात हल्लेखोरांकडून किंवा संशयास्पद स्थितीत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली.

Qari Saeed Abdul Aziz Dead Pakistan
Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

नुकताच लश्करचा आणखी एक कमांडर रिझवान हनीफ याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने उघड दावा केला होता की, गेल्या तीन ते चार वर्षांत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लश्करशी संबंधित 30 हून अधिक प्रमुख दहशतवादी रहस्यमयरीत्या मारले गेले आहेत. विशेषतः पेशावर, कराची, रावळपिंडी, रावलाकोट आणि मुझफ्फराबाद यांसारख्या शहरांमध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या या दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com