Shooting in America: अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिथे, एका 18 वर्षीय तरुणाला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या तरुणाने त्याचे आई-वडील आणि दोन भावंडांची हत्या केल्याचा आरोप आहे.
कारण ते 'नरभक्षक' होते. विशेष म्हणजे, त्याला खाण्याची ते योजना आखत होते. सीझर ओलल्दे असे आरोपीचे (Accused) नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
सीबीएस न्यूजनुसार, सीझर ओलल्दे याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. ओलल्दे याच्यावर त्याच्या पाच वर्षांच्या भावासह अनेकांची हत्या केल्याचा आरोप आहे.
टेक्सास पोलिसांनी (Police) सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की, ओलल्देच्या घरी एक व्यक्ती त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचताच तेथील दृश्य पूर्णपणे वेगळे होते.
दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पाहिले की, तो व्यक्ती त्याच्या घरात बॅरिकेड करत होता. या व्यक्तीच्या हातात शस्त्रही होते. यानंतर पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले.
पोलीस घरात घुसले आणि ते दृश्य पाहून धक्काच बसला. घराच्या बाथरुममध्ये, ओलल्देचे वडील रुबेन आणि अॅडा गार्सिया, मोठी बहीण लिस्बेट आणि लहान भाऊ ऑलिव्हर यांचे मृतदेह पडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाने एका ठिकाणी कुटुंबीयांची हत्या केली नाही. घराच्या वेगवेगळ्या भागात कुटुंबातील सदस्यांना गोळ्या घालण्यात आल्या.
कारण बाथरुम व्यतिरिक्त घराच्या इतर भागात रक्ताचे थारोळे आढळून आले आहेत.
याशिवाय, रिकामी काडतुसेही पोलिसांना सापडली आहेत. सर्वांची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह बाथरुममध्ये ओढून नेले.
दुसरीकडे, घटना घडली त्यावेळी ओलल्देच्या घरी काम करणारी एक महिलाही घरात पोहोचली होती, तिने दार ठोठावले पण उत्तर मिळाले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याला तपासात आढळून आले आहे.
यानंतर त्याने आपल्या एका साथीदाराला तिथे बोलावले. जबरदस्तीने घरात घुसले असता तो पहिल्यांदा ओलल्देच्या समोर आला.
ओलल्देचा हवाला देत महिलेने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याच्या कुटुंबाची हत्या केली कारण ते सर्व नरभक्षक होते आणि त्याला ठार मारुन खाण्याची योजना आखत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.