सिग्नलवर थांबला नाही म्हणून 17 वर्षीय मुलाला पोलिसाने घातली गोळी; फ्रान्समध्ये जाळपोळ, 150 जणांना अटक

पॅरिसमध्ये सध्या 2000 पोलीस येथे तैनात केले असून, आतापर्यंत 150 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
France shooting
France shootingDainik Gomantak

France shooting: ट्रॅफिक सिग्नलवर कार थांबवली नाही म्हणून पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गोळी झाडली यात त्याचा मृत्यू झाला. यावरून फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील नॅनटेरे येथे हिंसाचार उसळला आहे. बुधवारी उशिरापासून शेकडो लोक पॅरिसच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत.

आंदोलकांनी अनेक गाड्या पेटवल्या आहेत. गोळी झाडणाऱ्या पोलिसाला ताब्यात घेण्यात आले आहे. पॅरिसमध्ये सध्या 2000 पोलीस येथे तैनात केले असून, आतापर्यंत 150 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. असे बीबीसीने म्हटले आहे.

याप्रकरणी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, तरुणाच्या अशा हत्येला समर्थन देता येत नाही. असे मॅक्रॉन म्हणाले.

तर, गोळीबाराची ही घटना नियमांचे उल्लंघन आहे. असे पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न म्हणाल्या.

या घटनेप्रकरणी फ्रान्समधील खासदारांनी बुधवारी नॅशनल असेंब्लीत एक मिनिट मौन पाळले. पीडितेच्या कुटुंबीयांनी या घटनेशी संबंधित अधिका-यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

France shooting
शाहिद कपूरचा 'फर्जी'पाहून श्रीमंत होण्याची नशा चढली, थेट छापल्या 2000 च्या बंद झालेल्या नकली नोटा अन्...

नेमकं प्रकरण काय?

नानटेरे येथील रस्त्यावर पोलिसांनी एक कार थांबवली. कार चालक आणि पोलिसांमध्ये वाद सुरू असताना, पोलिसांनी चालकावर गोळी झाली. दरम्यान, यात अल्पवयीन चालकाचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली.

मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, हा कारचालक 17 वर्षांचा होता आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते. तर, इतर काही रिपोर्ट्सनुसार - पोलिसांनी या कारचा पाठलाग करून त्याला थांबवले.

थांबवल्यानंतर कार चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याच्या गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी 38 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले असून, त्याला ताब्यातही घेण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com