शाहिद कपूरचा 'फर्जी'पाहून श्रीमंत होण्याची नशा चढली, थेट छापल्या 2000 च्या बंद झालेल्या नकली नोटा अन्...

फर्जी सिरिजप्रमाणेच पैसे कमावण्याचा मार्ग स्विकारलेल्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
Delhi Police
Delhi Police Dainik Gomantak
Published on
Updated on

अलिकडेच आलेल्या शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सिरीजमध्ये नकली नोटा छापून श्रीमंत होण्याचा मार्ग पत्कारणाऱ्या दोन युवकांची आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटची कथा दाखवण्यात आली आहे. फर्जी सिरिजप्रमाणेच पैसे कमावण्याचा मार्ग स्विकारलेल्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, दोघांनी फर्जी वेब सिरीज पाहून 2000 रुपयांच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या बनावट नोटा छापल्या होत्या.

ताजिम आणि इर्शाद असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. बनावट 2000 रुपयांच्या बदल्यात त्यांनी स्वस्त दरात बदलण्यास सुरुवात केली. आरोपींकडून पोलिसांनी 5 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या सर्व नोटा 2000 च्या आहेत.

पंजाब आणि उत्तर प्रदेशसह दिल्ली आणि आसपासच्या भागात एक नवीन टोळी बनावट नोटा चलनात वापरत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळाली. माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी या टोळीबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही टोळी उत्तर प्रदेशातील कैराना येथून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

Delhi Police
Viral Video: दबक्या पावलांनी आला... रात्रीच्या अंधारात दुचाकीच्या डिक्कीतून चोरी, नावेली येथील घटना

टोळीचा एक सदस्य बनावट नोटा घेऊन दिल्लीतील अलीपूर येथे येणार असल्याची माहिती स्पेशल सेलला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताजीमला अलीपूर परिसरातून अटक केली, त्याच्याकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. चौकशीनंतर पोलिसांनी कैराना येथून इर्शादला अटक केली, त्याच्या घरातून तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

चौकशीदरम्यान आरोपींनी त्यांच्या दुकानात बनावट नोटा छापायला सुरुवात केली आणि नंतर त्या वितरीत करण्यास सुरूवात केली. त्यांना बनावट नोटा छापण्यासाठी खास शाई सापडली. तसेच, त्यासाठी चांगले कागद आणि प्रिंटरही आणले.

दोन्ही आरोपी दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये बनावट नोटांचा पुरवठा करायचे. दोघांनी आतापर्यंत किती बनावट नोटांचा पुरवठा केला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com