Chhattisgarh: अनुकंपा नियुक्तीसाठी आई-वडिल आणि आजीची हत्या; सॅनिटायझर टाकून जाळले मृतदेह

प्रभात यांचा मोठा मुलगा उदित भोई याला ड्रग्जचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, पैशासाठी तो अनेकदा आई-वडिलांशी भांडत असे.
Chhattisgarh Crime News
Chhattisgarh Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पैसे आणि नोकरीच्या लालसेपोटी आपल्या आई-वडिलांची आणि आजीची अनुकंपा नियुक्तीसाठी हत्या केली.

त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरी लाकूड आणि सॅनिटायझर टाकून जाळण्यात आले. यानंतर वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले असता घरात रक्ताचे डाग आढळून आले.

पोलिसांना घरात जळालेले मानवी अवशेष सापडले. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे मृत शिक्षकाचा मोठा मुलगा उदित याची कसून चौकशी केलीय. चौकशीत त्याने आई-वडील आणि आजीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील सिघोडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शिक्षक प्रभात भोई आणि पत्नी सुलोचना भोई, 75 वर्षीय आई झरना भोई यांच्यासह येथे राहत होते. प्रभात यांचा मुलगा उदितही त्यांच्यासोबत राहत होता.

प्रभात यांचा मोठा मुलगा उदित भोई याला ड्रग्जचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, पैशासाठी तो अनेकदा आई-वडिलांशी भांडत असे.

Chhattisgarh Crime News
Adani Group: हिंडनबर्ग प्रकरणी अदानी समुहाला दिलासा; प्रथमदर्शनी कोणतेही उल्लंघन नसल्याची अहवालात माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात मे रोजी शिक्षक प्रभात भोई आणि त्यांचा मुलगा उदित यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. त्याच दिवशी उदितने वडिलांच्या हत्येचा कट रचला. घरातील सर्वजण झोपी गेल्यावर उदितने रात्री 2 ते 3 च्या दरम्यान आधी वडिलांच्या डोक्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला, त्यानंतर आई सुलोचना यांची हत्या केली. त्याचवेळी उदितच्या आजीला जाग आल्याने तिनेही त्याच्या डोक्यात काठीने वार करून त्याचा खून केला.

आई-वडील आणि आजीची हत्या केल्यानंतर उदितने मृतदेह घरातील बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने घरामागे लाकूड आणि सॅनिटायझर टाकून तिघांचेही मृतदेह दोन दिवस जाळले. खुनाचा आरोपी उदित भोई याने अत्यंत धूर्तपणे 12 मे रोजी सिंगोडा पोलीस ठाण्यात वडील, आई आणि आजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Chhattisgarh Crime News
कोंबडीला दिला हिरवा रंग अन् पोपट म्हणून OLX वर विकला, लोक म्हणाले हाच खरा बिझनेसमॅन

पोलिसांनी शिक्षकाचा मोठा मुलगा उदित भोई याच्याकडे चौकशी केली असता त्याने आधी पोलिसांची दिशाभूल केली, मात्र पोलिस कडक झाल्यावर त्याने आई-वडील आणि आजीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी मुलगा उदितविरुद्ध कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आरोपी उदितची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. उदितने, सात मे रोजी पैशावरून भांडण झाले होते. त्यानंतर त्यांनी रात्रीच्या सुमारास तिघांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com