Iran Anti Hijab Protest: इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनाच्या एक दिवस आधी येथील सर्वात मोठ्या विद्यापीठातील जवळपास 1200 विद्यार्थी आजारी पडले आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना एकसारखीच समस्या जाणवत आहे. सर्वांना उलटी, अंगदुखी आणि डोकेदुखी असा त्रास होत आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर एढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आजारी पडल्यामुळे हे सरकारचे आंदोलन दडपण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे. या सर्व आजारी विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील विद्यार्थी संघटनेचा दावा आहे की, या विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील पाण्याच विष मिसळले गेले होते. आणि सरकारने कट रचून हे कारस्थान पार पाडले आहे.
दरम्यान, विद्यार्थी संघटनेच्या आरोपांवर सरकारने म्हटले आहे की, विद्यार्थी आजारी आहेत. पाणी दुषित असल्यामुळेच विद्यार्थी आजारी पडले.
विशेष म्हणजे, तेहरानमधील दोन विद्यापीठांमध्येही मंगळवारी असाच प्रकार घडला होता. तेव्हा अल जाहरा आणि इश्फहान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आजारी पडले होते. येथे दुषित पाण्याचा पुरवठा कँटीनमधून केला जात होता. जेव्हा सर्व विद्यार्थ्यांना हा त्रास होऊ लागला तेव्हा विद्यापीठाच्या दवाखान्यांमध्ये डी-हायड्रेशनची औषधेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे सर्व एका कारस्थानाचा भाग असल्याची चर्चा आहे.
इराणमध्ये सध्या हिजाबविरोधात आंदोलन पेटले आहे. सर्व स्तरातून हिजाबला विरोध होत आहे. पण सरकार मात्र महिलांनी हिजाब वापरण्यावर ठाम आहे. महिलांनी हे आंदोलन आधीपासूनच धगधगत ठेवले आहे. ईरानमध्ये 16 सप्टेंबर रोजी पोलिस कोठडीत 23 वर्षांची युवती महसा अमिनी हीचा मृत्यू झाला होता. हिजाब न परिधान केल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती. आत्तापर्यंत या आंदोलनात 300 जणांचा मृत्यू झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.