Goa: म्हापशात आज आणखी गर्दीची शक्‍यता, लोकांचा उत्‍साह शिगेला!

Mapusa: गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठा माटोळी तसेच सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत
Matoli Bazar
Matoli BazarDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठा माटोळी तसेच सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. यात माटोळीसाठी लागणाऱ्या कांगल्या, घागऱ्या, रानटी फळांनी सध्या म्हापसा बाजारपेठही भरली आहे. आजच्‍यापेक्षा उद्या मंगळवारी 30 रोजी म्हणजे चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

गोव्यात गणेशोत्‍सवात माटोळीला अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. चतुर्थीच्या काळात थोडेफार पैसे मिळतील, या आशेने ग्रामीण भागातील लोक अधिकतर महिला वर्ग मोठ्या संख्येने माटोळी विक्री बाजारात सामील होतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोटाळीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर भरला आहे. परंतु अजून तरी अल्पप्रतिसाद असल्याचे म्हापशातील विक्रेत्यांनी सांगितले. काहींनी सांगितले की, डोंगरावर जाऊन माटोळीला लागणारे साहित्य गोळा करावे लागते. दुसरीकडे, काहीजण बाणास्तरी येथून थेट माटोळी साहित्य खरेदी करतात आणि विविध बाजारपेठांत जाऊन व्यवसाय करतात.

Matoli Bazar
गणेशोत्सवात वापरली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

बार्देशसह पेडणे तालुका तसेच आजूबाजूचे लोक माटोळी तसेच चतुर्थीच्या खरेदीसाठी म्हापसा बाजारपेठेस भेट देतात. यावेळी बाजारात आलेले लोक हे माटोळी बाजारासह, भाजीपाला, सजावटीचे साहित्य खरेदी करतात. या माटोळी बाजारासह सजावटीचे साहित्य तसेच फटाक्यांनी स्टॉल्स सजले आहेत.

Matoli Bazar
Ganesh Chaturthi : बाणास्तारीत आजही माटोळी बाजार

म्हापसा बाजारपेठेत पालिका मार्केट समितीने माटोळी बाजारासाठी खास मार्केटमध्येच व्यवस्था केली होती. यासाठी जागाही चिन्हांकित केली होती. त्यानुसार, शकुंतला पुतळ्यासमोरील रस्त्यावर दुहेरी बाजूने विक्रेत्यांना बसविलेले. मात्र, मार्केटबाहेर मुख्य रस्त्यावर काही विक्रेते परस्पर बसले. यावेळी वाहतूक कोंडी होऊ लागल्याने संबंधितांना पालिकेने आतमध्ये बसण्यास परवानगी दिली.

दरम्‍यान, उद्या मंगळवारी म्‍हणजे गणेश चतुर्थीच्‍या आदल्‍या दिवशी म्‍हापसा बाजारात विक्रेत्‍यांबरोबरच ग्राहकांचीही झुंबड उडण्‍याची शक्‍यता आहे. आज सोमवारीही गर्दी झाली होती. पण दरवर्षी चतुर्थीच्‍या आदल्‍या दिवशी बाजारात झुंबड उडत असते.

* माटोळीच्‍या वस्‍तू आणि दर

नारळाची पेण 800 रु, सुपारीचे कात्रे 800, मोठे नारळ 100 रु, कांगले 100रु, मावळिंगे 100 रु, घाघरी 100 रु, माटा 50, तोरंग 100, हरिणे 50, कवणाळा 20, कराणे 20, आंबाडे 50 (20 नग), केळीच्या शिरत्या 50, चिबूड 100, उस (20 नग), केळीचा घड 400, वेलची केळी 80 रु. किलो, चिकू (10 नग), सफरचंद 140 किलो, सीताफळ (20 नग), मोसंबी 200 किलो, डाळींब 30 रु.(नग).

Matoli Bazar
Alex Reginald : वेर्णा-लाटंबार्से औद्योगिकचा ‘गतिशक्ती’अंतर्गत विकास

विराज फडके, म्हापसा पालिका मार्केट समितीचे अध्यक्ष-

माटोळी विक्रेत्यांसाठी पालिका मार्केट समितीने मार्केटमध्येच दोन रांगा करायचे ठरविले होते. मात्र विक्रेत्यांची संख्या वाढली. परिणामी मुख्याधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनेस विश्वासात घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून तिसरी रांग वाढविली. या मार्केटमध्ये सुमारे 300 पेक्षा जास्त माटोळीविक्रेते दाखल झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com