गणेशोत्सवात वापरली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर माटोळी बाजारात दाखल
Panjim Matoli Market
Panjim Matoli Market Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील गणेशोत्सव हा जय्यत तयारी करत साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात यंदा गणरायाच्या आगमणाची लगबग दिसू लागली आहे. मात्र ही लगबग माटोळीखेरीज अपूर्ण आहे. म्हणूनच आपण माटोळी म्हणजे काय ते सविस्तररित्या पाहूयात.

(Matoli flourish in Goa markets on the occasion of Ganesh Chaturthi)

Panjim Matoli Market
नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी गणेश विसर्जन स्थळाची केली पाहणी

गोवा आणि कोकण भागात माटोळी आणि गणरायाचे आगमण हे एकमेकांना पुरेसे असणारे आहे, कारण गणरायाचे आगमण माटोळी खेरीज होऊ शकत नाही. आणि माटोळीखेरीज गणरायाच्या आगमणाला पुर्णविराम मिळू शकत नाही. या परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहेत. यामूळे त्या आता गोवा संस्कृतीचा भाग बनल्या आहेत.

माटोळी म्हणजे नेमकं काय ?

सोप्या भाषेत सांगायचं तर माटोळी म्हणजे गणरायाच्या आगमणासाठी निसर्गातील साहित्य वापरले जाते. या करिता निसर्गातून सहज उपलब्ध होणारे फळे - फूले हे साहित्य एकत्र करत ते गणरायाच्या आराससाठी वापरले जाते. त्याला माटोळी म्हणतात.

Panjim Matoli Market
Vasco Market: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर माटोळी साहित्याने सजले

वर्षा ऋतूच्या कृपेने नुकतीच खुलू लागलेली रानफळे, यापैकी सुमारे 300 ते 400 हून अधिक वनस्पती, फळे फुले यासाठी वापरली जातात. या सर्व साहित्याचा एकत्रित वापर करत गणरायाच्या मुर्तीला चार ही बाजूंनी आरास करण्यासाठी या साहित्यला वापरले जाते. अर्थात मोटीळीसाठी ज्यांना ज्या प्रकारे साहित्य उपलब्ध होते. त्या प्रमाणे याचा वापर करत तयार केली जातात. ही माटोळी गणराच्या आगमणापासून ते गणेश विसर्जन होईपर्यंत तशीच राखली जाते.

माटोळीद्वारे पणजीसह राज्यातील अनेक बाजारांमध्ये मोठी उलाढाल

पणजी, मडगाव, बाणास्तरी बाजारासह इतर बाजारांमध्येही माटोळीसाठीचे सर्व साहित्य उपलब्ध असते ज्याचा वापर गणेश आगमणाकरिता केला जातो. या माटोळीमध्ये आंबाडे, आंब्या-ताळो, ईडलिंबू, कांगल्यो, कुड्डूक, घागऱ्यो, चिबुड, तवशें, माट्टा, आसाळे, नागुलकुडो अशा प्रकारच्या साहित्याचा समावेश होतो.

यातील विविध साहित्य विक्रीसाठी प्रतिवर्षी बाजारात दाखल होते. त्याप्रमाणे यंदा ही हे साहित्य गणरायाचं आगमण जल्लोषात व्हावे यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हळूहळू पुन्हा एकदा बाजारपेठा गजबजल्या असून आपल्या लाडक्या बाप्पासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

यंदाच्या बाजारात काय आहे नेमकं चित्र ?

चतुर्थीला लागणाऱ्या माटोळी बाजाराला आज दिनांक 29 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यामूळे राज्यातील पणजी, मडगाव, बाणास्तरी या मुख्य बाजारपेठांसह राज्यात अनेक ठिकाणी माटोळीला लागणारे साहित्य तसेच अन्य आवश्यकजिन्नसानी बाजारपेठेत दाखल झाले आहे. उद्या दिनांक 30 मंगळवार एकच शिल्लक असल्याने राज्यातील बाजारात एकाच दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे.

राज्यातील माटोळी साहित्याचे दर नेमके काय आहेत ?

राज्यातील माटोळी साहित्याचे दर बाजार पेठेप्रमाणे काहीशे कमी - अधिक होणारे असले तरी माटोळी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र मागच्या वर्षीपेक्षा दरात बहुतेक साहित्याचे दर वाढले आहेत. नारळाची पेण 300 ते 800 रुपये, सुपारीचे कात्रे 300 रुपयांपासून सुरुवात केळीच्या शिरत्या पन्नास नग 200 रुपये

केवनीचा दोर 50 ते 100 रुपये, कांगल्या 50 ते 100 रुपये मावळींगे 50 ते 100 रुपये, घागरी 100 रुपये, माटा 40 ते 60 रुपये जोड, तोरिंगण 100 रुपये, अंबाडे पन्नास 100 रुपये, चिबूट 80 रुपये, निरपणस 100 ते 300 रुपये, गौरी चुडी 50 रुपये, हळदीची 25 पाने 50 रुपये, कैऱ्या 100 रुपये एक नग, लाह्या 20 रुपये 100 ग्रॅम असा दर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com