यूट्यूबची देशात मोठी कारवाई, प्लॅटफॉर्मवरुन हटवले 22 लाखांहून अधिक व्हिडिओ; 2 कोटी चॅनलवरही बंदी

भारतात मोठी कारवाई करत, YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत.
YouTube|India
YouTube|IndiaDainik Gomantak

YouTube Removed More Than 22 Million Videos:

भारतात मोठी कारवाई करत, YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. कंपनीने रिपोर्ट जारी करुन सांगितले की, गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन 2.25 दशलक्ष म्हणजेच 22 लाख 50 हजार व्हिडिओ काढून टाकण्यात आले. हे व्हिडिओ ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान YouTube वरुन काढून टाकण्यात आले आहेत.

दरम्यान, Google ने मंगळवारी (26 मार्च 2024) जारी केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, 30 देशांमध्ये भारतातील जास्तीत जास्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी, सिंगापूरमधील सुमारे 12.4 लाख व्हिडिओ आणि अमेरिकेतील 7.8 लाख व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने (YouTube) त्याच्या प्लॅटफॉर्मवरुन 9 दशलक्ष किंवा 90 लाख व्हिडिओ काढून टाकले आहेत, त्यापैकी 96 टक्के व्हिडिओ Google च्या मशीनद्वारे प्लॅग केले आहेत.

YouTube|India
PM Modi: 'मोदी-मोदी' नारा देणाऱ्या तरुणांना थप्पड मारायला पाहिजे, कर्नाटकच्या मंत्र्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

दुसरीकडे, YouTube ने काढलेल्या एकूण व्हिडिओंपैकी 53.46 टक्के व्हिडिओंना फक्त एक व्ह्यू मिळाला होता. त्याचवेळी, 27.07 टक्के व्हिडिओ असे होते की, त्यांना काढून टाकण्यापूर्वी केवळ 1 ते 10 व्ह्यूज मिळाले होते. YouTube ने आपल्या निवेदनात म्हटले की, प्लॅटफॉर्मवरुन काढलेले हे व्हिडिओ त्यांच्या कम्युनिटी गाइडलाइन मॅच करत नव्हते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या निवेदनात म्हटले की, YouTube कम्युनिटी गाइडलाइन जगभरात समान आहेत. यामध्ये अपलोड करणारे युजर, ठिकाण आणि कॉन्टेंट जनरेशन कसा गेला आहे हे पाहिले जाते. सामग्री जागतिक स्तरावर काढून टाकली जाते आणि ती काढण्यासाठी मशीन लर्निंगची मदत घेतली जाते.

YouTube|India
PM Narendra Modi: पीएम मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्त्याविरोधात FIR दाखल

2 कोटी चॅनेलवरही बंदी घातली

इतकेच नाही तर, YouTube ने ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 20 दशलक्ष किंवा 2 कोटींहून अधिक चॅनेल काढून टाकले आहेत. YouTube च्या स्पॅम धोरणांतर्गत या चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. यावर अपलोड केलेल्या व्हिडिओंमध्ये दिशाभूल करणारा मेटाडेटा, थंबनेल आणि कॉन्टेंट आढळून आला आहे. याशिवाय YouTube वरुन 1.1 अब्ज कमेंट्सही हटवण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com