PM Narendra Modi: पीएम मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्त्याविरोधात FIR दाखल

Congress Spokesperson Pawan Kheda: भाजपचे आमदार मुकेश शर्मा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्याविरोधात हजरतगंज कोतवाली येथे गुन्हा दाखल केला आहे.
Congress Spokesperson Pawan Kheda
Congress Spokesperson Pawan KhedaDainik Gomantak

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपचे आमदार मुकेश शर्मा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्याविरोधात हजरतगंज कोतवाली येथे गुन्हा दाखल केला आहे.

पवन खेरा यांनी केलेल्या वक्तव्याचे त्यांनी 'हास्यास्पद' असे वर्णन केले आहे. मुकेश यांच्यासोबत हजरतगंज कोतवाली येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय बहादूर पाठक, ब्रज बहादूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते होते.

मुकेश शर्मा यांनी तक्रारीत लिहिले की, दिल्लीत (Delhi) झालेल्या पत्रकार परिषदेत पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवंगत वडील दामोदर दास मूलचंद मोदी यांच्यावर चुकीची टिप्पणी केली. नरेंद्र मोदींचे वडील नरेंद्र गौतम दास मोदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Congress Spokesperson Pawan Kheda
Prime Minister Narendra Modi: PM मोदींच्या भाषणात 'मोदी-अदानी भाई-भाई' च्या घोषणा; पंतप्रधान म्हणाले...

दुसरीकडे, नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे आणि ते गौतम दास की दामोदर दास? दामोदर दास हे नाव असले तरी त्यांची कृती गौतम दास सारखीच आहे, असे पवन खेरा म्हणाले. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधानांच्या दिवंगत वडिलांचा गौतम अदानी यांच्या वडिलांशी संबंध जोडून त्यांची जाणीवपूर्वक खिल्ली उडवली.

Congress Spokesperson Pawan Kheda
PM Narendra Modi: आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे आज पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

तसेच, इन्स्पेक्टर हजरतगंज अखिलेश मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणी आयपीसीच्या कलम 153-ए, 500,504 आणि 505 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com