नौदलातील माजी जवान कुटूंबासह गोव्याच्या ट्रिपवर; तिकडे घरातील मौल्यवान वस्तूंवर चोरांचा डल्ला...

दागिन्यांसह मद्याच्या बाटल्यांचीही चोरी
theft in Ex Navy jawans House in UP
theft in Ex Navy jawans House in UPDainik Gomantak
Published on
Updated on

Varanasi News: गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या नौदलाच्या जवानाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाराणसीजवळ लालपूर-पाण्डेयपूर येथील पत्रकार कॉलनी, प्रेमचंद नगर येथे ही घटना घडली आहे.

रामलाल सिंह यादव असे या जवानाचे नाव आहे. ते नौदलात मास्टर चीफ म्हणून कार्यरत होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. गोव्यात त्यांचे घर देखील आहे.

theft in Ex Navy jawans House in UP
बॉयफ्रेंडचा खून करून गोव्यात सेलिब्रेशन करणार होती गर्लफ्रेंड; नवीन मित्राला करायला लावला गोळीबार

10 ऑक्टोबर रोजी ते कुटूंबासह गोव्यात फिरायला गेले होते. तेव्हा ते घराची किल्ली जवळच राहणाऱ्या भाचा राजेश यादव याच्याकडे देऊन गेले होते. त्यांनी राजेशला घराची काळजी घ्यायला तसेच झाडांना पाणी घालायला सांगितले होते.

रविवारी 15 ऑक्टोबर रोजी रामलाल सिंह यादव गोव्याहून घरी परतले तेव्हा त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. तसेच घरातील सर्व साहित्य इतस्ततः पसरले होते.

त्यांनी तत्काळ पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. लालपूर-पाण्डेयपूर पोलिस ठाण्याचे निरीक्ष मनोज कुमार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फॉरेन्सिक पथकाला सूचना देऊन तपासाला सुरूवात केली आहे.

theft in Ex Navy jawans House in UP
IRCTC Goa Package: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा गोव्यात; IRCTC च्या खास पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल आणि बरंच काही...

सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, पत्नीचे दागिने, इंडक्शन स्टोव्ह इत्यादी सामान चोरीला गेले आहे. तसेच घरात मिलिट्री कँटिनमधून आणलेल्या दोन मद्याच्या बाटल्याही चोरीला गेल्या आहेत, अशी माहिती, रामलाल यांनी पोलिसांना दिली. सध्या पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com