Best CM: योगी आदित्यनाथ देशातले 'सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री', सर्वेक्षणात आले समोर

सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा खूप पुढे आहेत.
Best CM |yogi adityanath
Best CM |yogi adityanath Dainik Gomantak
Published on
Updated on

सध्या देशात 30 राज्यांमध्ये निवडून आलेली सरकारे आहेत. त्यात दिल्ली आणि पुद्दुचेरीसारख्या केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे प्रत्येक कामात वेगळे दिसत असले तरी, सर्वोत्कृष्ट कामगिरीचा विचार केला तर ते केवळ वेगळेच नाहीत तर इतर राज्यांतील त्यांच्या समकक्षांपेक्षा अनेक पावले पुढे उभे आहेत. असे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात जनतेने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

इंडिया टुडे आणि सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात देशाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात जेव्हा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री निवडण्याचा मुद्दा आला तेव्हा योगी आदित्यनाथ लोकांची पहिली पसंती ठरले आहे. सर्वेक्षणानुसार 39.1 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांची सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.

Best CM |yogi adityanath
Video: धक्कादायक! फेसबुक लाईव्ह दरम्यान तरुणाने स्वतःवर झाडली गोळी
  • मुख्यमंत्री केजरीवाल आणि ममता यांच्या लोकप्रियतेत घट

या यादित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 16 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना आपली पसंती दिली आहे, तर 7.3 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना पसंती दिली आहे. ज्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सर्वेक्षणानुसार सीएम योगी यांची लोकप्रियता त्यांच्या कामामुळे वाढली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या लोकप्रियतेत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये केजरीवाल यांना 22 टक्के लोकांची पसंती होती. ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेतही गेल्या वर्षभरापासून 1 टक्क्यांनी घट झाली आहे.

देशातील 30 राज्यांमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री निवडण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 1,40,917 लोक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

  • 2024 मध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार?

सर्वेक्षणात असाही प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार बनणार आहे. सर्वेक्षणात पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. भाजपला (BJP) 284 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. 

काँग्रेसच्या (Congress) कामगिरीत फारशी सुधारणा झाली नसली तरी. काँग्रेसला 68 जागा मिळतील. त्याचवेळी 191 जागा इतर पक्षांना जाताना दिसत आहेत. या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक पसंतीचे राजकारणी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 72 टक्के लोकांनी त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com