मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, आता शालेय विद्यार्थ्यांना मिळणार 'योगाचे धडे'

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणात ‘योग’ (Yoga) हा विषय खेळ म्हणून समाविष्ट केला आहे.
Yoga Education
Yoga Education Dainik Gomantak
Published on
Updated on

Yoga Education : योगसनांचा आपल्या एकंदरीत आरोग्यासाठी (Health) खूप महत्वाचा वाटा आहे. आपले शरीर फिट (Fit) ठेवण्यासाठी आणि रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी योगासनांची सवय असणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त शारीरिकच नव्हे तर आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी (Mental Health) देखील योगा करणे फायदेशीर ठरते.

Yoga Education
आईने रोवली साहित्याची बीजे, इथेच 'या' कथांची पात्रे भेटली

याचसंदर्भात मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) शालेय शिक्षणात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील शाळांमध्ये आता ‘योग’ हा विषय शालेय शिक्षणात समाविष्ट करण्यात येणार आहे. शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) सरकार यांनी योग हा विषय खेळ म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Yoga Education
गोवा: NEET, GCET प्रवेशाचे वेळापत्रक DTE द्वारे जाहीर

मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Policy on Education) 2020 साठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सभेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘योग हा खेळ म्हणून विकसित करून शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल. मध्य प्रदेशातील प्रत्येक जन-माणसांपर्यंत योगाच्या विस्तारासाठी ह्या आयोगाची स्थापना करण्यात येईल. विद्यार्थ्य़ांची शालेय शिक्षणात गोडी वाढण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी योग हा खेळ म्हणून अभ्यासक्रमात जोडला गेला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्य़ांना विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com