गोवा: NEET, GCET प्रवेशाचे वेळापत्रक DTE द्वारे जाहीर

dte.goa.gov.in या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक उपलब्ध आहे.
NEET
NEETDainik Gomantak

तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) गोवा ने NEET आणि GCET समुपदेशन वेळापत्रक जारी केले आहे. MBBS आणि BDS वगळता उर्वरित NEET आधारित पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची पहिली फेरी व अभियांत्रिकी (Engineering) आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी फेरी 14 डिसेंबरपासून सुरू होईल. dte.goa.gov.in या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक उपलब्ध आहे.

NEET
आईने रोवली साहित्याची बीजे, इथेच 'या' कथांची पात्रे भेटली

DTE ने अधिकृत अधिसूचनेत प्रवेशाची तारीख, अभ्यासक्रम, श्रेणी, गुणवत्ता क्रमांक आणि अहवाल देण्याची वेळ जाहीर केली आहे.

“ फेरीत सहभागी होताना मास्क (Mask), स्वच्छता, सामाजिक अंतर (Social Distance) इत्यादींशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. उमेदवारांनी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. फेरीदरम्यान उमेदवारासोबत एकापेक्षा जास्त व्यक्ती येऊ नयेत,” असे DTE च्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना कळवले आहे.

NEET
रशियातून दिल्लीमार्गे गोव्यात आलेले प्रवासी Omicron संशयित: मुख्यमंत्री

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील उमेदवार, ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला नाही किंवा उशिरा अर्ज सादर केला आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह मंगळवार, 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता खोली क्रमांक 1, तंत्रशिक्षण संचालनालय, पोर्वोरिम येथे भेट द्यावी, असे DTE वेबसाइटवर नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com